शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

सराईत चोरट्याकडून नऊ दुचाकी वाहने जप्त

By admin | Updated: January 25, 2017 02:13 IST

मौजमजा करण्यासाठी शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी अटक केली असून

पुणे : मौजमजा करण्यासाठी शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून पावणेतीन लाख रुपये किमतीच्या ९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. प्रवीण ऊर्फ प्रशांत दिलीप जाधव (वय २१, रा. इनामके मळा, लोहियानगर) असे त्याचे नाव आहे. जाधव हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, शहरातील विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव यांना त्यांच्या बातमीदाराकडून मिळाली की, शहरातील विविध भागात दुचाकी चोरणारा प्रवीण जाधव हा शुक्रवार पेठेतील स्वामी गगनगिरी नवरात्र मंदिर परिसरात येणार आहे. त्यानुसार खडक पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने दुचाकीवरून आलेल्या जाधवला सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेल्या दुचाकीबाबत त्याला विचारणा केली असता, त्याने सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्याने सारसबाग येथील सणस ग्राऊंड परिसरातून दुचाकी चोरल्याचे समोर आले. खडक पोलिसांनी त्याला अटक करून पुढे केलेल्या चौकशीत त्याने एकूण ९ दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. जाधव याच्याविरुद्ध अलंकार, स्वारगेट, खडक, सिंहगड पोलीस ठाण्यात वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव, निरीक्षक (गुन्हे) संभाजी शिर्के, सहायक निरीक्षक व्ही. डी. केसकर, तपास पथकाचे उपनिरीक्षक संजय गायकवाड, कर्मचारी संतोष मते, बशीर शेख, बापू शिंदे, राकेश क्षीरसागर, रवी लोखंडे, संदीप कांबळे यांच्या पथकाने केली.(प्रतिनिधी)