शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

निलेश चव्हाणला ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी; पिता - पुत्रांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 13:43 IST

निलेश चव्हाण काही संबंध नसताना बाळ का घेऊन गेला? हगवणे यांच्यासोबत काही आर्थिक व्यवहार झाले का? हे तपासायचे आहे

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाणला ७ जून पर्यंत पोलीस कोठडी तर सुशील आणि राजेंद्र हगवणे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. फरार असलेला संशयित नीलेश चव्हाण याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शुक्रवारी (३० मे) नेपाळ सीमेवरून अटक केले होते. त्यानंतर त्याला मंगळवार, ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. तर सुशील आणि राजेंद्र हगवणे यांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज पुन्हा तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन आणि पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.   

वैष्णवी हगवणे प्रकरणातील तीन आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले होते. सासरा राजेंद्र हागवणे, दीर सुशील हगवणे आणि सह आरोपी असलेल्या निलेश चव्हाण यांना बावधन पोलिसांनी कोर्टात हजर केले होते.  तीन आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात आज पुन्हा सुनावणी झाली.  पिंपरी चिंचवड पोलिसांना या तिन्ही आरोपीची एकत्रित चौकशी करायची असल्याकारणाने आज पुन्हा पोलीस कोठडी वाढवून मागण्यात आली. तिन्ही आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.  

निलेशचा कटात सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्याने त्याचा अधिक तपास करायचा आहे. अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे. तसेच काही संबंध नसताना बाळ का घेऊन गेला? याचा तपास करायचा आहे. हगवणे कुटुंबासोबत झालेलं तपासायचं आहे म्हणून पोलीस कोठडी मागण्यात आली. आरोपीच्या वकिलांनी यावेळी एकही नवीन मुद्दा  नसल्याचे सांगितले आहे. राजेंद्र आणि सुशीलला न्यायालयीन कोठडीची मागणी केली आहे. या सगळ्या छळाच्या प्रकरणात निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंब यांचे काही आर्थिक व्यवहार होते का हे तपासायचे आहे. अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. या युक्तिवादानंतर सुशील आणि राजेंद्र हगवणे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी तर निलेश चव्हाणला ७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

निलेश चव्हाणच्या पोलीस कोठडीत वाढ

वैष्णवीच्या कुटुंबीयांना धमकावणे, तिच्या मुलाला बळजबरीने ठेवणे, आणि शस्त्र दाखवून धमकी देणे असे गंभीर आरोप नीलेश चव्हाण याच्या विरोधात होते. तसेच त्याच्याकडून शशांक, लता आणि करिष्मा यांचे मोबाईलही जप्त करण्यात आले होते. आता त्या मोबाईलमधून वैष्णवीच्या छळाचे चॅट्स मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. त्या अनुषंगाने पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली होती. अजूनही काही पुरावे मिळण्याची शक्यता असल्याने पुन्हा एकदा निलेश चव्हाणच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 

पिता पुत्रांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी 

राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.या सगळ्या छळाच्या प्रकरणात निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंब यांचे काही आर्थिक व्यवहार होते का हे तपासायचे असल्याने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

टॅग्स :PuneपुणेVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेPoliceपोलिसWomenमहिलाCourtन्यायालयmarriageलग्न