Nigdi Tanker Accident: भरधाव वेगाने तो आला, आडवा झाला, झोप उडवून गेला; निगडीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 01:20 PM2023-06-26T13:20:12+5:302023-06-26T13:21:19+5:30

पुलावरच सुटला त्याचे नियंत्रण....

Nigdi Tanker Accident: He came at full speed, fell over, fell asleep; Events in Nigdi | Nigdi Tanker Accident: भरधाव वेगाने तो आला, आडवा झाला, झोप उडवून गेला; निगडीतील घटना

Nigdi Tanker Accident: भरधाव वेगाने तो आला, आडवा झाला, झोप उडवून गेला; निगडीतील घटना

googlenewsNext

- विश्वास मोरे

पिंपरी : साखर झोपेची वेळ असताना रविवारची पहाटे तीनच्या सुमारास सुमारे अठरा टन गॅसने भरलेला टँकर दुभाजकाला धडकला आणि रस्त्यावरच आडवा झाला. त्यातून गॅस गळती सुरू झाली. ही वार्ता परिसरात पसली आणि वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे निगडी प्राधिकरणातील नागरिकांची झोप उडाली. त्यानंतर अधून-मधून कोसळणारा पाऊस, भुयारी मार्गाचे काम सुरू असल्याने अरूंद झालेला रस्ता अशा अडचणींचा सामना करीत अग्निनिशमन दल, पोलिस, आपत्ता व्यवस्थानाच्या जवानांना सुमारे बारा तास प्रयत्नांची शिकस्त करीत गॅस गळती रोखली. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

मुंबईकडून-पुण्याकडे जाताना निगडीतील भक्ती-भक्ती उड्डाणपुल आणि टिळक चौकातील मधुकर पवळे उड्डाणपूलापूर्वी प्राधिकरणातून यमुनानगर किंवा निगडी गावठाणात जाण्यासाठी भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे मुंबईकडून पुण्यास जाताना भक्ती शक्ती उड्डाणपुल संपतो तिथे रस्ता वळविण्यात आला आहे. शंभर ते दोनशे मीटरच्या जागेत वळण तयार केलेले आहे. तसेच रस्ताही अरूंद झाला आहे.

पुलावरच सुटला त्याचे नियंत्रण
मुंबईहून पुण्याच्या दिशेने चाललेल्या भारत गॅसच्या टँकरमध्ये १७.८०० द्रवरूप गॅस भरण्यात आला होता. भक्ती-शक्ती उड्डाणपूल ओलांडून उतरत असताना  द्रवरूप गॅसने भरलेल्या टँकरवरील नियंत्रण राजेंद्र प्रसाद यादव यांचे नियंत्रण सुटले त्यामुळे तिन गतीरोधक असतानाही त्यावरून आदळत थेट टँकर वेगाने खाली आला. जिथे रस्ता संपतो तिथे रस्त्याच्या कामामुळे वळण निर्माण केले आहे. टँकरवरील ताबा सुटल्याने पहिल्यांदा दुभाजकाला धडकून वळणावरच पलटी झाला. त्यात चालक गंभीर जखमी झाला. त्यानंतर घटनास्थळावरील नागरिकांनी पोलिस आणि अग्निशमक दलास कळविले.

असा आहे घटनाक्रम
१) पहाटे ३.१० वाजता -टँकर पलटी
२) पहाटे ३.१५ मिनिटे -पोलिस पथक दाखल
३) ३.२१ मिनिटे- अग्निशमन दलास कॉल-
४) पहाटे -३.३०- प्राधिकरणातील अग्निशमन दल पथक दाखल, त्यानंतर शहरात पाच ठिकाणांचे पथके दाखल.
५) सकाळी साडेसातला- गॅस कंपनीचे अधिकारी दाखल
६) सकाळी नऊ- गॅस दुसºया वाहनात भरण्यास सुरूवात.
७) सकाळी अकरा-२५ टक्के गॅस दुसºया वाहनात टाकण्यास सुरूवात. चार क्रेन मागविले.
८) दुपारी १.१०-गॅस रिफीलींग बंद, टँकर उभा करण्याचे नियोजन सुरू.
९) दुपारी ३.०४-चार क्रेनच्या माध्यमातून टँकर उभा केला. डद्बायव्हरच्या बाजूस सुरू अशाणारे लिकेंज थांबविले. त्यानंतर गॅस स्थलांतरीत केला. धोका टळला.

Web Title: Nigdi Tanker Accident: He came at full speed, fell over, fell asleep; Events in Nigdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.