शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र इसिस मॉड्युलप्रकरणी NIA मोठी कारवाई; दहशतवादी डॉ. अदनानली सरकारला कोंढव्यातून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 16:57 IST

ISIS महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गुरुवारी आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे....

पुणे : देशविघातक कृत्याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस आणि विविध राष्ट्रीय तपास संस्था कारवाई करत आहेत. आता आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. ISIS महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गुरुवारी आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे.

पुणे शहरातील कोंढवा परिसरात छापा टाकून ही कारवाई केली आहे. यामध्ये डॉ. अदनानली सरकार (४३) याला अटक करण्यात आली. एनआयएने सरकारच्या कोंढवा घराच्या झडतीदरम्यान इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि ISIS शी संबंधित अनेक दस्तऐवज जप्त केली आहे. हा आरोपी तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी भरती करत होता, अशी माहितीही तपासात समोर आली आहे.

या आरोपीने इस्लामिक स्टेट (IS)/इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (ISIL)/इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया (ISIS)/ Daish/Islamic State in Khorasan सारख्या वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणार्‍या ISIS च्या दहशतवादी कारवाईमध्ये मदत केल्याचे समोर आले. एनआयएच्या तपासानुसार, आरोपी अदनानली सरकार भारत सरकारविरोधात दहशतवादी कृत्य करण्यासाठी विविध दहशतवादी संघटना मदत करत होता.

या प्रकरणातील ही पाचवी अटक आहे, ज्याची NIA ने 28 जून 2023 रोजी नोंद केली होती. मुंबई, ठाणे आणि पुणे येथे शोध घेतल्यानंतर 3 जुलै 2023 रोजी NIA ने इतर चार जणांना मुंबईत अटक केली होती. मुंबईतील तबिश नासेर सिद्दीकी, पुण्यातील जुबेर नूर मोहम्मद शेख, ठाण्यातील शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला अशी त्यांची नावे आहेत.

टॅग्स :PuneपुणेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाTerrorismदहशतवादterroristदहशतवादीISISइसिसKondhvaकोंढवा