पुढच्या वर्षी जुन्नर तालुका राज्यात आदर्श ठरेल - शरद सोनवणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 00:26 IST2018-12-26T00:22:29+5:302018-12-26T00:26:00+5:30
जुन्नर तालुक्यातील रस्त्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ७८४ कोटी रुपये मंजूर झाले असून, मे २०१९ पर्यंत तालुक्यातील सर्व रस्ते पूर्ण झालेले असतील.

पुढच्या वर्षी जुन्नर तालुका राज्यात आदर्श ठरेल - शरद सोनवणे
नारायणगाव - जुन्नर तालुक्यातील रस्त्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ७८४ कोटी रुपये मंजूर झाले असून, मे २०१९ पर्यंत तालुक्यातील सर्व रस्ते पूर्ण झालेले असतील. त्या वेळी जुन्नर तालुका राज्यातील आदर्श तालुका म्हणून समोर येईल, असे प्रतिपादन जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी वारुळवाडी येथे दिली.
वारुळवाडी ग्रामपंचायत येथे ३ कोटी रुपयांतून बांधण्यात येणाऱ्या ग्रामसचिवालयाचे भूमिपूजन सोनवणे यांच्या हस्ते झाले. या वेळी तीस लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाºया पशुवैद्यकीय दवाखान्याचे भूमिपूजन आणि भिकाजी दगडू फुलसुंदर यांच्या स्मरणार्थ फुलसुंदर व भागेश्वर देवस्थान, मुक्ताई देवस्थान यांंच्याकडून पाच लाख ५१ हजार रुपयांच्या वैकुंठरथाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशाताई बुचके, युवानेते अमित बेनके, उपजिल्हाधिकारी व जुन्नर तालुक्याचे भूमिपुत्र सुनील थोरवे, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, संतोषनाना खैरे, दिलीप गांजाळे, मंगेश काकडे, अर्चना माळवदकर, रमेश खुडे, एम. डी़ भुजबळ, नारायणगावचे सरपंच योगेश (बाबू) पाटे, उपसरपंच संतोष दांगट, सुजित खैरे, संजय वारुळे, जालिंदर कोल्हे, आशिष फुलसुंदर, वारुळवाडीचे सरपंच ज्योत्स्ना फुलसुंदर, उपसरपंच सचिन वारुळे, माजी सरपंच आत्माराम संते, बबन काळे, सुनील ढवळे, सुलोचना काळे, अनिल खैरे, उषा खैरे, ग्रा़ सदस्य विपुल फुलसुंदर, राजेंद्र मेहेर, जंगल कोल्हे, परशुराम वारुळे, भाग्यश्री पाटे, खुशाल काळे, वर्षा वºहाडी, माया डोंगरे, सविता पारधी, मनाबाई भालेराव, जयश्री बनकर, सुनीता बटाव, अंजली संते, ईश्वर अडसरे, दशरथ जाधव, शाखा अभियंता आर. जी. होडगे, विद्याधर मुळूक, रज्जाक कुरेशी, डॉ़ संजय कुमकर आदी उपस्थित होते. आशाताई बुचके, माऊली खंडागळे, संतोषनाना खैरे, जंगल कोल्हे आदींनी विचार व्यक्त केले़ सुनील मेहेर यांनी सूत्रसंचालन केले.
वारुळवाडी व नारायणगावच्या विकासासाठी सर्व पक्षाची नेतेमंडळी एकत्रित आहोत. ग्रामसचिवालयासाठी आमदार फंडातून २० लाख रुपये देण्यात आलेले आहेत़ वारुळवाडी-सावरगाव रस्त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल. जुन्नर तालुका विकासकामांत मागे राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली़
- शरद सोनवणे, आमदार