शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

'पुढे मुलीचा खून झालाय; आम्ही पोलीस आहोत, तुमच्या संरक्षणार्थ दागिने आमच्याकडे द्या', असे सांगून महिलेला लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 17:52 IST

मंचर गावच्या हद्दीत पिंपळगाव फाटा येथे ही घटना घडली

ठळक मुद्दे३ तोळे वजनाचे अंदाजे ९० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र हातचलाखी करून चोरट्यांनी पळवून नेले

मंचर : पोलीस असल्याचा बनाव करून सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक महिलेचे दागिने लुटून नेल्याची गंभीर घटना घडली आहे. मंचर गावच्या हद्दीत पिंपळगाव फाटा येथे ही घटना घडली असून दोन जणांविरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मंचर येथील रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स येथे राहणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षिका सुनंदा तानाजी वाबळे या बुधवारी दुपारी साडेबारा वाजता पेन्शनचे पैसे काढण्यासाठी बँकेत गेल्या होत्या. ते पैसे पतसंस्थेत भरून त्या घरी येत असताना पिंपळगाव फाट्याजवळ एका मोटारसायकलसोबत दोन व्यक्ती उभ्या होत्या. त्यांतील एकाने वाबळे यांना 'मावशी इकडे या' म्हणून हाक मारली. ''पुढे एका मुलीचा खून झाला आहे. आम्ही पोलीस आहे. तुमच्या संरक्षणार्थ तुमच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून द्या ते मी तुमच्या पिशवीत सेफ मध्ये ठेवतो. असे म्हणाले'' 

त्यावेळी वाबळे यांनी तुम्ही पोलिसांचा ड्रेस घातलेला नाही. तुमच्या पायात बूट नाहीत तुम्ही कसे पोलीस आहात. असे विचारल्याने त्यांनी वाबळे यांना कोणते तरी ओळखपत्र दाखवले. वाबळे यांच्याकडे चष्मा नसल्याने त्यांना ते ओळखपत्र नीट व्यवस्थित वाचता आले नाही. त्यावेळी त्या दोघांनी वाबळे यांना बोलण्यामध्ये गुंतवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसूत्र घेऊन हातचलाखीने ते पिशवी मध्ये टाकले असे दाखवून मोटरसायकलवर निघून गेले.

त्यानंतर वाबळे या घरी येऊन त्यांनी पिशवी पाहिली असता त्यांना सोन्याचे मनी मंगळसूत्र दिसले नाही. त्यांचे तीन तोळे वजनाचे अंदाजे ९० हजार रुपये किंमतीचे मनी मंगळसूत्र हातचलाखी करून त्या चोरट्यांनी पळवून नेले असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 

टॅग्स :MancharमंचरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकWomenमहिला