पुण्यात सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 16:26 IST2022-01-08T16:23:11+5:302022-01-08T16:26:34+5:30
सासरी होणार्या छळाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या

पुण्यात सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या
पुणे : माहेरहून सोन्याचे दागिने, पैसे घेऊन येण्यासाठी सासरी होणार्या छळाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी पती आणि सासू यांना अटक केली आहे. विक्रांत सुनिल बेगळे आणि वर्षा सुनिल बेगळे (दोघे रा. जनसेवा सांस्कृतिक हॉलजवळ, पांडवनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच दीर विस्मय सुनिल बेगळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधिका विक्रांत बेगळे (वय २३, रा. पांडवनगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
याप्रकरणी वैशाली सुनिल सोनवणे (वय ४८, रा. हडपसर) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १८ जुलै २०२१ ते ६ जानेवारी २०२२ दरम्यान घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी राधिका हिचा विक्रांत बेगळे याच्याबरोबर विवाह झाला होता.
लग्न झाल्यापासून तिला माहेरहून पैसे आण. सोन्याचे दागिने आण, यासाठी सतत मानसिक व शारिरीक छळ केला जात होता. या छळाला कंटाळून तिने ६ जानेवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक टेमगिरे अधिक तपास करीत आहेत.