पतीच्या छळामुळे नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; अवघ्या ३ महिन्यातच संपविले आयुष्य
By विवेक भुसे | Updated: September 21, 2023 19:43 IST2023-09-21T19:39:21+5:302023-09-21T19:43:13+5:30
नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर...

पतीच्या छळामुळे नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; अवघ्या ३ महिन्यातच संपविले आयुष्य
पुणे : पतीच्या मानसिक त्रासाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विवाहानंतर अवघ्या तीन महिन्यात ती आपले आयुष्य संपविले. गौरी चेतन सोनवणे (वय १९, रा. ओटो स्कीम, बिबवेवाडी) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे.
याप्रकरणी तिचा भाऊ महेश रामभाऊ मोहिते (वय २५, रा. सासवड) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चेतन संजय सोनवणे (वय २५) आणि प्रगती संजय सोनवणे (वय ४५, रा. बिबवेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरी हिचा चेतन सोनवणे याच्याबरोबर २९ मे २०२३ रोजी विवाह झाला होता. चेतन हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. लग्नानंतर पती वारंवार दारु पिऊन येऊन गौरी हिला मानसिक त्रास देत होता. तिला मारहाण करीत होता. लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यातच या छळाला कंटाळून गौरी हिने १७ सप्टेबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ६ वाजता हा प्रकार समोर आला. पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे तपास करीत आहे़.