शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

कोथरूड प्रकरणात नवीन वळण; 'सिव्हिल कपड्यातील' व्यक्ती कोण? पोलिसांना थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 15:46 IST

पोलिसांनी कोथरूड ठाण्यात तीन मुलींना जातिवाचक शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा आरोप करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याबाबत ॲट्रॉसिटी कायद्यानुसार संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल व्हावा

पुणे - पोलिसांनी कोथरूड ठाण्यात तीन मुलींना जातिवाचक शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा आरोप करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याबाबत ॲट्रॉसिटी कायद्यानुसार संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी करण्यात आली. मात्र, त्यानंतर तब्बल १२ तासांपेक्षा जास्त वेळ घेऊन ही घटना वस्तुस्थितीवर आधारित नसून गुन्हा दाखल करता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणात पोलिस आयुक्तालयाकडून सहकाऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप आता आंदोलकांकडून होत आहे.छत्रपती संभाजीनगर येथून एक विवाहित तरुणी सासरच्या त्रासाला कंटाळून पुण्यात आली. मैत्रिणींच्या मदतीने कोथरूड येथे राहणाऱ्या तीन तरुणींच्या फ्लॅटमध्ये तिने आश्रय घेतला आणि काही काळाने निघूनही गेली. याच कारणामुळे, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी पुण्यात येऊन कोथरूड पोलिसांच्या मदतीने वॉरंट नसतानाही मुलींच्या फ्लॅटवर छापा टाकला. त्यांनी मुलींच्या सामानाची तपासणी केली आणि त्यांना कोथरूड पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत पाच तास बसवून ठेवले. या खोलीत त्यांना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली, असा आरोप करण्यात आला.या प्रकरणाची दखल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, तसेच वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी या मुलींसह रोहित पवार, सुजात आंबेडकर यांच्यासह इतर सामाजिक कार्यकर्ते रविवारी मध्यरात्रीनंतरही पोलिस आयुक्तालयाबाहेर ठाण मांडून बसले होते. आमदार पवार यांनी सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, या प्रकरणात दखलपात्र गुन्हा दाखल करता येणार नसल्याचे पोलिसांकडून लेखी देण्यात आले आहे.

‘तो’ साध्या वेशातील कोण?कोथरूड येथील मुलींच्या फ्लॅटवर पोलिसांसोबत एक साध्या वेशातील व्यक्तीदेखील आली होती, अशी माहिती मुलींनी दिली. ती व्यक्ती कोण? महिला पोलिसांसोबतच संबंधित माजी पोलिस अधिकारी आणि पोलिस दलात कार्यरत नसलेल्या व्यक्ती युवतींच्या कोथरूड येथील घरी चौकशीसाठी का गेल्या होत्या, पोलिस नसलेल्या या व्यक्ती कोण आहेत, या व्यक्ती पोलिस दलातील कुणाशी संबंधित आहेत? असे प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी