शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांसाठी नवा सुरक्षा फॉर्म्युला; ‘कॉप्स २४’ तत्काळ मदतीसाठी सज्ज..!

By नितीश गोवंडे | Updated: January 29, 2025 09:37 IST

‘कॉप्स २४’ माध्यमातून ७०० पोलिस कर्मचारी पुणेकरांच्या मदतीसाठी २४ तास उपलब्ध राहणार

पुणे :पोलिसांच्या कंट्रोल रूमला (नियंत्रण कक्ष) फोन करताच मदतीसाठी धावून येणारे बीट मार्शल आता ‘कॉप्स २४’ नावाने ओळखले जाणार आहे. या माध्यमातून ७०० पोलिस कर्मचारी पुणेकरांच्या मदतीसाठी २४ तास उपलब्ध राहणार आहेत. सध्या या कॉप्स ना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू असून, त्यांच्यासाठी वेगळा ड्रेसकोडही असणार आहे.गुन्हे शाखेकडून या कॉप्स २४ वर नियंत्रण ठेवले जाणार असून, चारचाकी आणि दुचाकीच्या सहाय्याने ते सर्वसामान्यांच्या मदतीसाठी तत्काळ हजर होणार आहेत. यामुळे पुणे पोलिसांचा रिस्पॉन्स टाईम देखील कमी होणार असून, अवैध धंद्यांवर देखील वचक निर्माण होण्यास मदत होणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.शहरातील कायदा आणि सुव्यवस्था, परिणामकारक पेट्रोलिंग, अडचणीतील नागरिकांना तत्पर पोलिस मदत, पोलिसांचा रस्त्यावरील वावर, नागरिकांच्या मनात सुरक्षिततेचे वातावरण तयार करून पोलिस दलाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ‘कॉप्स २४’ हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. सीआर मोबाईलसाठी २३४, तर कॉप्ससाठी ४९२ अशा ७२६ महिला आणि पुरुष अंमलदार यात असणार आहेत, विशेष म्हणजे २२ ते २८ वयोगटातील पोलिस कर्मचाऱ्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.पुणे पोलिसांकडून सध्या पोलिस ठाणे स्तरावर बीट मार्शल ही संकल्पना राबवली जाते. प्रत्येक पोलिस चौकीला रात्री आणि दिवसा अशा वेळी दोन-दोन अंमलदार बीट मार्शल म्हणून काम करतात. पोलिस ठाण्यात उपलब्ध असलेल्या मनुष्यबळावर त्यांची संख्या अवलंबून असते. रस्त्यावरील गुन्हेगारी कमी करण्यासह एखादा गुन्हा घडल्यानंतर तत्काळ मदत आणि नागरिकांच्या मनात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याबरोबरच त्यांना अडचणीच्या काळात मदतीसाठी ही बीट मार्शल संकल्पना राबवली जात होती. मात्र मनुष्यबळ तसेच पोलिस ठाण्याच्या कामाचा ताण यामुळे प्रभावी पेट्रोलिंग होत नसल्याचे पोलिस आयुक्तांच्या निदर्शनास आले. तर काही बीट मार्शलचे भलतेच उद्योग निदर्शनास आल्याने, सध्याच्या बीट मार्शलचा मुख्य उद्देश साध्य होत नसल्याचे स्पष्ट झाले.यावर उपाय म्हणून पोलिस आयुक्तांनी बीट मार्शलपेक्षा प्रभावी कामकाज व्हावे, यासाठी कॉप्स-२४ ही संकल्पना सुरू केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम प्रथम सुरू केला जाणार आहे. त्यानंतर त्याचे रूपांतर कामकाजात केले जाणार आहे. हा उपक्रम सुरू होताच पोलिस ठाण्याचे बीट मार्शल बंद होणार आहेत.असा आहे उपक्रम...कॉप्स - २४ मध्ये महिला आणि पुरूष मिळून असणार ७२६ अंमलदार- अंमलदारांची वयोमर्यादा २२ ते २८- रिस्पॉन्स टाईम ७ मिनिटांवरून ५ मिनिटांवर आणण्यासाठी प्रयत्न- कॉप्ससाठी १२५ दुचाकी आणि ३९ चारचाकी वाहने- दोन सत्रात (दिवस-रात्र) पेट्रोलिंग, प्रत्येक पोलिस ठाण्यासाठी एक कार- काही घटना घडल्यास, तत्काळ पोहोचून मदत व प्राथमिक कार्यवाहीयापूर्वी चार्ली संकल्पना...यापूर्वी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत असताना ‘चार्ली’ ही संकल्पना राबवली होती. त्याची चर्चा आजही छत्रपती संभाजीनगर येथील नागरिकांमध्ये आहे. त्यावेळी देखील या चार्लींवर थेट गुन्हे शाखा आणि पोलिस आयुक्तांकडूनच नियंत्रण ठेवण्यात येत होते. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी, अवैध धंदे बंद झाले होते. सर्वसामान्यांना तत्काळ मदतही मिळत होती. त्याच धर्तीवर आता पुणे शहरात कॉप्स २४ ही संकल्पना राबवली जाणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी