शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम प्रकल्पासाठी महापालिकेची नवी नियमावली !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 14:59 IST

ध्वनिप्रदूषण आणि कचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेचा पुढाकार

पिंपरी : शहरामध्ये झपाट्याने औद्योगिकीकरण वाढते आहे. याचबरोबर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामांची संख्या सुद्धा वाढत असून, महापालिकेने नागरिकांना चांगले जीवनमान देण्याच्या हेतूने शाश्वत आणि पर्यावरणपूरक बांधकाम पद्धती स्वीकारली आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. गुरुवारी (दि.१९) याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले.नागरिकांच्या तक्रारींचा विचार करून आणि क्रेडाई (कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया) या संस्थेसोबत उपापयोजना चर्चा करून ठरविण्यात आल्या आहेत. शाश्वत शहरी विकासाला चालना देण्यासाठी या नवीन नियमांमध्ये ध्वनिप्रदूषण, जलसंधारण आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. रात्रीच्या बांधकामांवर बंदी...शहरातील नागरिकांकडून करण्यात आलेल्या तक्रारींनंतर रात्री १० ते सकाळी ७ या वेळेमध्ये पिंपरी-चिंचवड हद्दीतील बांधकामांवर बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच सर्व नवीन गृहनिर्माण प्रकल्पांसाठी वैयक्तिक पाणी मीटर बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे पाण्याच्या वापराचा वैयक्तिक स्तरावर मागोवा घेता येणार असून, यामाध्यमातून पाण्याचा अपव्यय टाळता येणार आहे. याशिवाय, गृहनिर्माण युनिट्समध्ये बांधकाम व्यावसायिकांनी घराचा ताबा देताना एरेटर टॅप्स बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे.बांधकाम कचरा व्यवस्थापनावर भर...महापालिकेने बांधकाम आणि बांधकाम पाडणीच्या कचऱ्यासाठी दररोज १५० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे व्यवस्थापन केले आहे. नवीन नियमांनुसार बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या प्रकल्पातून मिळणाऱ्या किमान १० टक्के पुनप्रक्रिया केलेल्या वस्तू म्हणजेच पेवर ब्लॉक सारख्या रचना नसलेल्या वस्तू वापरासाठी घेणे बंधनकारक असेल. सदर परिपत्रकाचे बांधकाम व्यवसायिकांनी पालन न केल्यास त्यांना भोगवटा प्रमाणपत्र दिले जाणार नाही. असा सुद्धा नियमावलीमध्ये उल्लेख केला आहे.

नागरिकांच्या समस्या सोडविण्याबरोबरच पर्यावरणपूरक विकास आणि शाश्वत शहरी विकासासाठी आम्ही ही पावले उचलत आहोत. जलसंधारण, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक उपायांवर भर देऊन आम्ही भविष्यासाठी व शाश्वत शहर निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. - शेखर सिंह, आयुक्त, महापालिका

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेMuncipal Corporationनगर पालिकाTaxकरReal Estateबांधकाम उद्योग