शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शेजारचे बांधकामावरून आम्हाला त्रास देतायेत; किरकोळ कारणावरून तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

By विवेक भुसे | Updated: May 28, 2023 16:12 IST

तरुणाने विरोध केल्यानंतर मानसिक त्रास करून घेत स्वतःला संपवले

पुणे : येण्यासाठी असलेला लोखंडी जिना काढून त्या जागी सिमेंटचा जिना बांधण्यास शेजारच्यांनी सुरुवात केली. त्याला विरोध केल्याने तरुणाला त्रास दिला. हा मानसिक त्रास सहन न झाल्याने एका २४ वर्षाच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मनोज मोहन दाभोळकर (वय २४, रा. आनंद विहार, हिंगणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडिल मोहन दाभोळकर (वय ५०) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अशोक गोपाळ बांडागळे (वय ५०) आणि कल्पना अशोक बांडागळे (रा. आनंद विहार, हिंगणे) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १० एप्रिल रोजी घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकाच ठिकाणी राहतात. त्यांच्या येण्या जाण्यासाठी सामाईक लोखंडी जिना होता. बांडागळे यांनी तो जिना काढून तेथे सिमेंटचा जिना बांधण्यास सुरुवात केली. त्याला फिर्यादीचा मुलगा मनोज व पत्नीने विरोध केला. तेव्हा बांडागळे यांनी आम्ही जिना तर बांधणारच तुला काय करायचे ते कर, असे बोलले. त्याचा मानसिक त्रास करुन घेऊन मनोज याने १० एप्रिल रोजी घरात कोणी नसताना दोरीचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली होती. शेजारचे बांडागळे हे बांधकामामुळे आम्हाला त्रास देत आहेत, म्हणून मी आत्महत्या करत आहे, असे लिहिले होते. याप्रकरणी अकस्मात मृत्यु अशी नोंद करण्यात आली होती. तपासात हा प्रकार समोर आल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक साबळे तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू