घरफोड्या करणारी नेपाळी टोळी जेरबंद

By Admin | Updated: June 18, 2015 00:06 IST2015-06-18T00:06:03+5:302015-06-18T00:06:03+5:30

शहराच्या विविध भागांतील सोसायट्यांमध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करीत असतानाच घरफोड्या करणारी नेपाळी टोळी गुन्हे शाखेच्या युनिट

Neighboring gang of robbery | घरफोड्या करणारी नेपाळी टोळी जेरबंद

घरफोड्या करणारी नेपाळी टोळी जेरबंद

पुणे/हडपसर : शहराच्या विविध भागांतील सोसायट्यांमध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करीत असतानाच घरफोड्या करणारी नेपाळी टोळी गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने जेरबंद केली असून, या टोळीकडून घरफोडीचे तेरा गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी चोरीचा माल विकत घेणाऱ्या सोनारांनाही अटक केली असून, १० लाख ८९ हजार २०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.
अशोक ऊर्फ मॅक परबहादूर क्षेत्री (रा. निझामुद्दीन, दिल्ली), गोरे ऊर्फ गणेश रती राणा (वय २४, रा. नितीन सोसायटी, ऊंड्री), मदत मनबहादूर थापा (वय ३६, रा. आंबेगाव बुद्रुक) यांच्यासह राजस्थानातील सोनार मोतीराम केवलचंद सोनी (वय ४८) यांनाही अटक केली आहे. युनिटचे सहायक निरीक्षक महादेव वाघमोडे यांना खबऱ्याने अशोक क्षेत्री याच्याबाबत माहिती दिली होती. क्षेत्री नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने दिल्लीमध्ये सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्या दिल्ली येथील घरामध्ये तीन लाखांचे दागिने मिळून आले. त्यानंतर तपास करून अन्य आरोपींनाही अटक करण्यात आली. चोरलेला सर्व माल त्यांनी सोनी याला विकला होता. त्याला राजस्थानामधून अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Neighboring gang of robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.