शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांची मांदियाळी, तरी प्रश्न अधांतरीच

By admin | Updated: March 16, 2015 04:28 IST

गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच ४ मंत्री, १० खासदार व २७ आमदार अशी नेतेमंडळींची मांदियाळी पुण्याला लाभली आहे. तरीही मेट्रो, ‘पीएमआरडीए’, रिंगरोड, ‘एसआरए’

पुणे : गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच ४ मंत्री, १० खासदार व २७ आमदार अशी नेतेमंडळींची मांदियाळी पुण्याला लाभली आहे. तरीही मेट्रो, ‘पीएमआरडीए’, रिंगरोड, ‘एसआरए’, होर्डिंग धोरण असे काही प्रश्न प्रलंबित आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुणेकरांच्या पदरात त्यापैकी काय पडणार? असा सवाल उपस्थित होत आहे. गेल्या काही वर्षांत बारामती व इंदापूर तालुके वगळता शहराला एकही मंत्रिपद मिळाले नव्हते. त्यामुळे पुणे शहरातील महत्त्वाच्या प्रलंबित प्रश्नांचे घोंगडे भिजत पडले आहे. त्यामुळे शतप्रतिशत भाजपाच्या घोषणेप्रमाणे पुणेकरांनी शहरातील आठही विधानसभेच्या जागांवर भाजपाचे आमदार निवडून दिले. शिवाय पिंपरी व जिल्ह्यात मिळून आणखी तीन जागा भाजपाला मिळाल्या. कॅबिनेटमंत्री गिरीश बापट हेच पालकमंत्री आहेत. त्यांना पुण्याच्या प्रश्नांची चांगली जाण आहे. शिवाय केंद्रीय राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे अशी एकूण चार मंत्रिपदे मिळाली आहेत. त्यामुळे पुण्याची राजकीय ताकद केंद्र व राज्य शासनाच्या पातळीवर वाढली आहे. तरीही पुण्याच्या पाठीमागून नागपूरला मेट्रो व आयआयएमचा प्रकल्प मंजूर झाला, याची सल पुणेकरांना वाटत आहे. भाजपाकडून अमर साबळे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवडीची शिफारस आहे. त्यामुळे पुण्याला शरद पवार, प्रकाश जावडेकर, शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, अनिल शिरोळे, सुप्रिया सुळे, अ‍ॅड. वंदना चव्हाण, अनु आगा, संजय काकडे यांच्यानंतर दहावे खासदार म्हणून साबळे यांची निवड होणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुणे मेट्रोसाठी १२५ कोटींची तरतूद झाली. मात्र, मेट्रो प्रकल्पाला अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही. त्यासाठी पुण्याचे दहा खासदार काय प्रयत्न करणार, यावरच प्रकल्पांचे भवितव्य ठरणार आहे. विधानसभेचे २१ आणि विधान परिषदेचे ६ आमदार पुण्यात आहेत. त्यामुळे विधिमंडळात पुण्याची ताकद वाढली आहे. मात्र, या राजकीय ताकतीचे रूपांतर पुणेकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक राजकीय इच्छाशक्तीमध्ये होणे गरजेचे आहे. तरच, गेल्या काही वर्षांतील पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), मेट्रो प्रकल्प, झोपडपट्टी पुनर्वसन नियमावली, शहरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी आवश्यक रिंगरोड, शहराचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी महापालिकेचे जाहिरात धोरण आदी प्रलंबित प्रश्न सोडविले जाऊ शकतात.