शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

डॉक्टरांबाबत नकारात्मक दृष्टिकोन चुकीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 3:57 AM

रात्री-अपरात्री पेशंटला नातेवाईक रुग्णालयात दाखल करतात. अशा वेळी जवळ पैसे नसल्यास त्यांच्यावर विश्वास ठेवून डॉक्टर उपचार करतात. अनेकदा रुग्ण फसवून निघून जातात. हजारो-लाखो रुपयांची जबाबदारी आपल्या नावावर घेणाऱ्या डॉक्टरविषयी समाजात गैरसमजच अधिक दिसून येतात.

पुणे - रात्री-अपरात्री पेशंटला नातेवाईक रुग्णालयात दाखल करतात. अशा वेळी जवळ पैसे नसल्यास त्यांच्यावर विश्वास ठेवून डॉक्टर उपचार करतात. अनेकदा रुग्ण फसवून निघून जातात. हजारो-लाखो रुपयांची जबाबदारी आपल्या नावावर घेणाऱ्या डॉक्टरविषयी समाजात गैरसमजच अधिक दिसून येतात. कुठल्याही डॉक्टरला आपला रुग्ण हा आजारीच राहावा, असे वाटत नाही. मात्र, काही दिवसांपासून वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांत महत्त्वाचा घटक असलेल्या डॉक्टरांंबाबत दिसून येणारा नकारात्मक दृष्टिकोन चिंताजनक आहे, अशी खंत असोसिएशनच्या वैद्यकीय पदाधिकांनी व्यक्त केली.‘लोकमत’च्या व्यासपीठावर असोसिएशनच्या वतीने विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जगन्नाथ महाजन, असोसिएशनचे सेक्रेटरी, डॉ. राजेश देशपांडे, डॉ. सुषमा जाधव, डॉ. प्रिया देशपांडे, डॉ. चिन्मय उमरगी, डॉ. अभय, डॉ. अश्विनी, डॉ. वैशाली साठे, डॉ. सायली, डॉ. शिरीष लोखंडे, डॉ. संतोष खामकर, डॉ. नारायण जेठवानी उपस्थित होते.बीएम संघटनेविषयी माहिती देताना डॉ. देशपांडे म्हणाले, ‘‘संस्थेत साधारण २०० सभासद असून दर वर्षी संस्थेच्या वतीने विविध उपक्रम आयोजित केले जातात. रक्तदान शिबिरे, लहान मुलांकरिता आरोग्य शिबिरे, नवोदित वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा, चर्चासत्रे, व्याख्याने यांतून समाजातील बदलत्या आरोग्य परिस्थितीचा वेध घेतला जातो. आगामी काळात आरोग्याच्या सर्व सुविधा एकाच छताखाली याव्यात, याकरिता मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिरे, कार्यशाळा यांचे आयोजन करणे गरजेचे आहे. या माध्यमातून विविध आजारांविषयी नागरिकांना मार्गदर्शन मिळेल.’’डॉ. सुषमा जाधव म्हणाल्या, ‘‘दैनंदिन आरोग्यासह भोवतालच्या पर्यावरणाकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. याकामी संस्था समुपदेशनाचे काम करते. केवळ आपलेच आरोग्य सुद्ृढ राहायला हवे, असा अट्टहास चुकीचा असून आपल्याबरोबर पर्यावरण स्वच्छ कसे राहील, याचा विचार नागरिकांनी करावा.’’डॉ. उमरगी यांनी स्त्रियांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘महिला या स्वत:च्या आरोग्याविषयी गांभीर्याने विचार करीत नाहीत. यामुळे अनेकदा गंभीर स्वरूपाची व्याधी दीर्घकाळ सुप्तावस्थेत असल्याने त्यावर उपाय करणे अवघड होऊन बसते. भीती हेच मुळी आरोग्याची परवड होण्यामागील मुख्य कारण सांगता येईल. योग्य आहार, विहार आणि निद्रा यांवर भर देणे जरुरीचे आहे.’’याचबरोबर, डॉ. राकेश यांनी महिलांमधील वाढत जाणाºया कर्करोगाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘‘कॅन्सरविषयक जनजागृती हा बीएमचा मुख्य उद्देश आहे. त्याच्या माध्यमातून पीडितांसाठी तपासणी केंद्र सुरू व्हायला हवे. सध्या महिलांमध्ये छातीच्या, गर्भाशयाच्या कॅन्सरची संख्या लक्षणीय आहे. तसेच, पुरुषांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येते.’’अँडल्ट व्हँक्सिनेशन संकल्पनाच नाहीआपल्याकडे अद्याप लसीकरण हे केवळ लहान मुलांनाच केले जाते, अशी मानसिकता असल्याने त्याचा फटका मोठ्या व्यक्तींना सहन करावा लागतो. परदेशात मोठ्या प्रमाणात अडल्ट व्हॅक्सिनेशन होत असल्याने त्यांच्याकडे साथीचे आजार, संसर्गजन्य आजार यांच्यापासून संरक्षण करण्याची तयारी केली जाते. तुलनेने आपल्याकडे आरोग्यासाठी बजेट असावे, असा विचारच वेडगळपणाचा समजण्याची पद्धत रूढ आहे, अशी खंत डॉ. लोखंडे यांनी व्यक्त केली.हदयविकारतज्ज्ञाला नावेच ठेवली जातातहृदयविकारतज्ज्ञाला पेशंट १०० टक्के बरा व्हायला हवा, असे वाटत असते. मुळातच रुग्णाच्या मनात जर डॉक्टरांंबद्दल विश्वासार्हता नसल्यास अशा वेळी डॉक्टरांनी त्याला उपचाराविषयी कितीही मार्गदर्शन केल्यास ते व्यर्थ ठरते. हृदयविकारतज्ज्ञ जेव्हा गरज असेल अशा वेळेसच अँजिओप्लास्टी करतो. त्यातही स्टेनिंगच्या दराबाबत अनेक प्रकारचे गैरसमज दिसून येतात. डॉक्टरांकडून जादा दर आकारला जातो, अशी तक्रार रुग्णाची असते. तसेच सेकंड ओपिनियन हा प्रकार वाढल्याने सल्ले घेण्यातच रुग्णाचा वेळ जात असल्याने त्याची प्रकृती ढासळते. अशा वेळी ती पूर्ववत करण्यासाठी शस्त्रक्रि येशिवाय दुसरा पर्याय नसतो, असे डॉ. अभय यांनी सांगितले.

टॅग्स :docterडॉक्टरPuneपुणे