शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नीरेत ‘बीएचआर’चा ठेवीदारांना गंडा

By admin | Updated: June 28, 2015 00:07 IST

पुरंदर तालुक्यातील नीरा शहरातही भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी- स्टेट-को- आॅप. क्रेडिट सोसायटीने ठेवीदारांना कोट्यवधीचा गंडा घातल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

नीरा : पुरंदर तालुक्यातील नीरा शहरातही भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी- स्टेट-को- आॅप. क्रेडिट सोसायटीने ठेवीदारांना कोट्यवधीचा गंडा घातल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. सोसायटीच्या संचालक मंडळ आणि स्थानिक सल्लागार मंडळाच्या विरोधात ठेवीदार खातेदारांनी तक्रार दिल्याने पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बीएचआरच्या नीरा शाखेतील सल्लागार मंडळाविरुद्ध कडक कारवाई करून संबंधितांना अटक करावी, अशी संबंधित ठेवीदारांनी पोलिसांकडे मागणी केली आहे. याबाबत जेजुरीचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील या पतसंस्थेच्या शाखेत ११ मार्च २०१४ रोजी नीरा शहरातील बाजारतळ परिसरातील रहिवासी वामन यशवंत सुतार यांनी ३६५ दिवसांच्या मुदतीसाठी ५ लाख रुपयांची रक्कम ठेव म्हणून ठेवली होती. एक वर्षाची मुदत संपल्यानंतर, मुदत ठेव पावती क्र.०७७९७९६ ही ठेवीची पावती घेऊन रक्कम घेण्यासाठी सुतार हे नीरा शाखेत गेले. त्या वेळी बीएचआर पतसंस्थेमधील संबंधितांनी बारामती आणि पुणे शाखेमध्ये घोटाळा झाल्याने शाखा बंद झाली असून, ठेवीची रक्कम परत देऊ शकत नाही, असे सांगितले. त्या वेळी बीएचआर पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन प्रमोद भाईचंद रायसोनी, चेअरमन दिलीप कांतिलाल चोरडिया, व्हाइस चेअरमन मोतीलाल ओंकार जिरी या तिघांसह नीरा शाखेतील सल्लागार मंडळाने (संचालक) फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने, या पतसंस्थेच्या तिघा पदाधिकाऱ्यांसह नीरा शाखेतील सल्लागार मंडळाविरुद्ध तक्रार दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुतार यांच्यासह शहरातील आणि परिसरातील अनेक ठेवीदार आणि खातेदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. दरम्यान या पतसंस्थेत अनेक जणांच्या ठेवी अडकल्या असून, ठेवीदार हवालदिल झाले आहेत.(वार्ताहर)या प्रकरणी बीएचआर संस्थेचे तिन्ही प्रमुख पदाधिकारी सध्या कोठडीत असल्याने, संबंधितांना न्यायालयाच्या परवानगीने चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येणार आहे. ठेवीदार, खातेदारांच्या आर्थिक फसवणुकीला प्रामुख्याने जबाबदार असणाऱ्या संस्थेच्या नीरा शाखेच्या सल्लागार मंडळाच्या संबंधिताना लवकरच चौकशीसाठी ताब्यात घेऊन, कडक कारवाई करणार- रामदास शेळके, पोलीस उपनिरीक्षक