शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नीरा-देवघर प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्न पुन्हा पेटणार : आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 13:07 IST

नीरा-देवघर धरणात २१ गावे बाधित झाली आहेत.

ठळक मुद्देआंदोलनाचा इशारा : वीस वर्षांपासून मागण्या प्रलंबित; दोनशे खातेदारांचे प्रस्तावही रखडलेलेनीरा-देवघर प्रकल्पग्रस्तांचे २०० खातेदारांचे प्रस्ताव अद्याप नाही मंजूर

भोर : नीरा-देवघर प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्या गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित असून, त्या पूर्ण  व्हाव्यात, यासाठी ५ ऑगस्टपासून आंदोलन करण्याचा इशारा नीरा-देवघर धरणग्रस्त पुर्नवसन विकास शेतकरी संघटनेने दिला आहे. याबाबतचे निवेदनही संघटनेचे अध्यक्ष बाळासो मालुसरे व सचिव नथू दिघे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.निवेदनात म्हटले आहे की,   देवघर गावाला नियोजन आराखड्याप्रमाणे वाटपासाठी आज शिल्लक क्षेत्र नसून येथील क्षेत्र साळव गावातील खातेदारांना आराखडाबाह्य जमीन वाटप केले आहे, त्याची चौकशी करावी. उपभूमी अभिलेख, खंडाळा हे नकाशाची नक्कल देत नसून ते टाळाटाळ करतात, फलटण तहसीलदार यांनी खंडाळा तालुक्यातील गावनिहाय लेखी माहिती १५ दिवसांत द्यावी. प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनी मिळाल्या नाहीत. त्यांनी त्वरित कार्यकारी अभियंता नीरा-देवघर भाटघर यांच्याकडून उदरनिर्वाह भत्ता द्यावा. नीरा-देवघर धरणात २१ गावे बाधित झाली आहेत. त्यामधील  खातेदारांचे पुनर्वसन करावे. फलटण तालुक्यातील कोळकी येथील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी असणारी जमीन क्षेत्राची नीरा-देवघर प्रकल्पग्रस्तांनाच वाटप करावी. माझेरी येथील कार्यकारी अभियंता नीरा-देवघर यांचे नावे असणारी जमीन मिळकत शिवाजी कवडे व वैभव कवडे हे अतिक्रमण करून वहिवाटत आहेत. या जमिनीत रस्ते, तलाव व बंगले आहेत याची चौकशी करावी. प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांचे ५ ऑगस्टला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. निवेदनाच्या प्रती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार संग्राम थोपटे, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांना देण्यात आल्या आहेत. या मागण्यांसाठी गल्या वीस वर्षांमध्ये अनेकवेळा प्रकल्पग्रस्तांनी निवेदन दिले शिवाय आंदोलनही केले. मात्र, शासनाने पोकळ आश्वासनांशिवाय काहीच दिले नाही. ...या आहेत प्रमुख मागण्यानीरा-देवघर प्रकल्पग्रस्तांचे २०० खातेदारांचे प्रस्ताव अद्याप मंजूर नाही. उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन यांनी खातेदारांचा जाब-जबाब आठ दिवसांत उपजिल्हाधिकारी पुनर्वसन सातारा यांच्याकडे सोपवावा, प्रकल्पग्रस्तांना लागणारे सर्व भूसंपादन व ६५ टक्के दाखले शेतकऱ्यांकडे नसतील, तर भूसंपादन क्र. १७ व ३ यांनी द्यावे, जमिनीचे बदली प्रस्ताव केले जात नाहीत ते करावे..........

टॅग्स :PuneपुणेDamधरणFarmerशेतकरीGovernmentसरकार