शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे ‘पालकमंत्र्यां’च्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 13:10 IST

राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत येऊनदेखील सध्या जिल्ह्यात सध्या अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही नेत्याने फारसे लक्ष घातले नाही.  ...........

ठळक मुद्देगेल्या दहा दिवसांत जिल्ह्यातील विविध विषयांचा घेतला आढावाज्या पक्षाचे आमदार अधिक त्या पक्षाचा पालकमंत्री असे सूत्र महाशिव आघाडीमध्ये ठरले आहे.

पुणे : शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे जिल्ह्यात अधिक लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. गेल्या पंधरा दिवसांत गोऱ्हे यांनी पुणे शहराच्या पाणी प्रश्नासह, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचा आढावा, शहर आणि जिल्ह्याचा वाहतुकीचा प्रश्न, जेजुरीगडाचा प्रश्नासह प्रमुख तीर्थक्षेत्र विकास योजना आणि रोजगार हमी योजनेच्या कामांचा आढावा घेत पुण्याच्या ‘पालकमंत्री’ची भूमिका पार पाडली आहे. पुणे जिल्ह्याला पालकमंत्री कोण मिळणार, याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. ज्या पक्षाचे आमदार अधिक त्या पक्षाचा पालकमंत्री असे सूत्र महाशिव आघाडीमध्ये ठरले आहे. यामुळे पुण्याचे पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाला मिळणार असल्याचे मानले जाते. ‘राष्ट्रवादी’तून पक्षाचे ज्येष्ठे नेते दिलीप वळसे पाटील की अजित पवार यांच्याकडे पालकमंत्रिपद जाणार याची उत्सुकता आहे. परंतु सध्या तरी ही कमी शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे  भरून काढताना दिसत आहेत. विधान परिषदेच्या उपसभापती या नात्याने त्या बैठका घेण्याचा झपाटा दाखवत आहेत...........मंत्री मंडळाच्या विस्तारानंतर निर्णय होणार

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणिकाँग्रेसचे महाशिव आघाडीचे सरकार स्थापन होऊन १५ दिवसांचा कालावधी लोटला आहे. मुख्यमंत्र्यांसह प्रत्येक पक्षाचे दोन असे सहा आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. परंतु अद्यापही मंत्रिपदाचे वाटप मात्र झालेले नाही. तर मंत्री मंडळाच्या विस्तारानंतर पुणे जिल्ह्याला पालकमंत्री कोण मिळणार, हे स्पष्ट होईल. परंतु अजित पवार यांच्या बंडानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री पद नक्की कुणाला मिळणार याबाबत उलटसुलट चर्चा आहे. परंतु अद्याप मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबतच काही हालचाली होताना दिसत नाही. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत येऊनदेखील सध्या जिल्ह्यात सध्या अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही नेत्याने फारसे लक्ष घातले नाही. ...........या उलट शिवसेनेच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोºहे यांनी गेल्या पंधरा दिवसांत शहर आणि जिल्ह्यातील विविध विषायांवर अधिकाºयांच्या बैठका घेतल्या आहेत. काही विषयांमध्ये अधिकाºयांना आदेश देऊन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्नदेखील केले आहेत. ......

टॅग्स :PuneपुणेNeelam gorheनीलम गो-हेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाAjit Pawarअजित पवार