शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यवीर सावरकर समाजापर्यंत पोहोचविण्याची गरज : प्रवीण तरडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 17:54 IST

हिंदुत्ववादी, धर्माला वेगळ्या दृष्टीने पाहणारे, प्रखरवादी, शिस्तबद्ध, भाषाप्रभू स्वातंत्र्यवीर सावरकर पुढील पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देदृकश्राव्य वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण 

पुणे : सध्या काही गटांचा विचित्र वातावरण तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी, धर्माला वेगळ्या दृष्टीने पाहणारे, प्रखरवादी, शिस्तबद्ध, भाषाप्रभू स्वातंत्र्यवीर सावरकर पुढील पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत सद्सद्विवेकबुध्दीने सावरकर समाजापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे, असे मत लेखक-दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांनी व्यक्त केले. 

स्वानंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मी सावरकर ही व्हॉट्सअ‍ॅपद्वारे दृकश्राव्य वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण फर्ग्युसन महाविद्यालयातील अ‍ॅम्फी थिएटर येथे करण्यात आले होते. विविध गटातील विजेत्या स्पर्धकांमधून ओजस जोशी याची महाविजेता म्हणून निवड करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार उदय माहुरकर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, सुशील जाधव, ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय बर्वे, रणजीत नातू, अमेय कुंटे, प्रवीण गोखले, शैलेश काळकर, अभिनेते सुनील अभ्यंकर, कॅप्टन नीलेश गायकवाड उपस्थित होते. उदय माहुरकर म्हणाले, सावरकर हे महान भविष्यवक्ता होते. जोपर्यंत पाकिस्तान आहे तोपर्यंत भारत सुखाने झोपू शकणार नाही, असे त्यांनी तेव्हाच सांगितले होते. सामाजिक स्तरावर विभाजन झाले की भौगोलिक स्तरावर देखील विभाजन होणार, हे माहीत असल्यानेच त्यांचा विभाजनाला कायम विरोध होता. सध्याच्या परिस्थितीत सावरकरांच्या बिनशर्त राष्ट्रवादाचा अवलंब केला पाहिजे. स्पर्धेत विविध गटांमध्ये सोहम कुलकर्णी, स्वप्नजा वालवाडकर, मधुरा घोलप, मेजर मोहिनी कुलकर्णी, नितीन पटवर्धन, विनय वाटवे, शेखर माळवदे, जाई ठाणेकर, आदि माळवदे यांनी यश मिळवले. स्पधेर्तील मागील व यावर्षीच्या स्पर्धकांची भाषणे मी सावरकर या यु-ट्यूब चॅनलवर पाहता येणार आहेत.  

टॅग्स :PuneपुणेVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरPravin Tardeप्रवीण तरडेGovernmentसरकार