शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नितीन आगेच्या न्यायासाठी मंत्रालयावर धडकणार मोर्चा; पुण्यातील विश्रामगृहावर झाली बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 13:02 IST

अहमदनगर, खर्डा गावातील अल्पवयीन तरुण नितीन आगे याची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी, यासाठी लवकरच विविध संस्था-संघटनांच्या वतीने मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.

ठळक मुद्देविविध संस्था-संघटनांच्या वतीने मंत्रालयावर धडक मोर्चानियोजनासाठी राज्यव्यापी बैठक रविवारी (दि. १७) मुंबई येथे घेण्यात येणार

पुणे : अहमदनगर, खर्डा गावातील अल्पवयीन तरुण नितीन आगे याची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी तसेच आॅनर किलिंग व जातीय धार्मिक हिंसाचाराच्या घटनांतील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी लवकरच विविध संस्था-संघटनांच्या वतीने मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.पुणे येथील शासकीय विश्रामगृहात ज्येष्ठ नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. गेल आॅम्वेट विशेष उपस्थित होत्या. रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे, सुवर्णा डंबाळे, अश्विन दोडके, भारिप बहुजन महासंघाचे प्रा. म. ना. कांबळे, मास मुव्हमेंटचे विजय जगताप, रिपब्लिकन सेनेचे युवराज बनसोडे, मातंग समाजाचे नेते अशोक लोखंडे, शंकर तडाखे, प्रकाश वैराळ,  लोकजनशक्तीच्या आरती साठे, कॉ. भिमराव बनसोड, केशव वाघमारे, अंकुश शेडगे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २५ जानेवारी रोजी मंत्रालयावर लक्षावधी लोकांचा धडक मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. याबाबत नियोजनासाठी राज्यव्यापी बैठक रविवारी (दि. १७) मुंबई येथे घेण्यात येणार आहे.नितीन आगे हत्याकांड खटल्यात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टमधील तरतुदीनुसार विशेष न्यायालयाची स्थापना न करणे तसेच विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती न करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेवून राजीनामा द्यावा, तसेच या खटल्याची फेरतपासणी व सुनावणी व्हावी आदी मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहेत.

टॅग्स :Mantralayaमंत्रालयMumbaiमुंबईPuneपुणे