शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
6
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
7
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
8
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
9
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
10
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
11
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
12
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
13
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
14
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
15
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
16
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
17
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
18
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
19
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
20
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...

चांदणी चौकातील पूलावरून श्रेयवादाची लढाई; सुप्रिया सुळेंचा दावा अन् भाजपाचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 18:19 IST

या चौकातील काम रेकॉर्ड ब्रेक वेळेत पूर्ण ...

पुणे : देशाचे वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शहरातील राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील एनडीए चौक (चांदणी चौक) उड्डाणपूल प्रकल्प व रस्त्याच्या कामाचे तसेच खेड व मंचर बायपासच्या चौपदरीकरण कामाचे आज लोकार्पण झाले. काही महिन्यांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या चौकातील कोंडीत अडकले होते. तसेच त्यावेळी पुणेकरांनी त्यांच्या समस्याही मांडल्या होत्या. वाहतूक कोंडीवर तातडीने उपाय करून मुख्यमंत्री शिंदे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या चौकातील काम रेकॉर्ड ब्रेक वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले. आज अखेर या कामाचे लोकार्पण झाले.

काल (११ ऑगस्ट) भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांनी नाराजी दर्शविली होती. या पुलाच्या लोकार्पण सोहळ्याच्या पत्रिकेत त्यांचे नाव नव्हते. यापूर्वी त्या कोथरूडच्या आमदार असताना त्यांनी या परिसरातील कोंडी सुटण्यासाठी प्रयत्न केले होते. त्याचा उल्लेखही गडकरी यांनी त्यांच्या भाषणात केला होता. त्या व्हिडिओची एक क्लीप सोशल मीडियावर पोस्ट केली. त्याचबरोबर कार्यक्रमाची पत्रिका आणि त्याचे मेसेज पोस्टमध्ये टाकल्याने पुणे शहर भाजपमधील राजकारण दिसून आले होते. त्यानंतर लगेच सुत्रे हालली आणि सकाळी गडकरींच्या स्वागतासाठी भाजप शहराध्यक्षांसह मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या. कार्यक्रमानंतर नितीन गडकरी हे कुलकर्णी यांच्या घरीही गेले. तिथे त्यांची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला गेल्याचे सांगितले जात आहे. 

 

कामाच्या श्रेयवादावरून ट्विटर वॉरः

या पुलाच्या कामावरून श्रेयवाद चांगलाच पेटलेला दिसतोय. या कामासाठी राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या वतीने केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. याबद्दलचे ट्विट करत त्यांनी खुलासा केला. सुळे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'पुणे शहरातील चांदणी चौक येथील वाहतूक आजपासून सुरळीत होत आहे. येथील कामांचे आज लोकार्पण होत आहे, याचे समाधान आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या खात्याचे मंत्री नितीनजी गडकरी यांनी वारंवार या कामाबाबत वैयक्तिक लक्ष घालून ते मार्गी लावण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. या कामावरील मजूर, अभियंते, प्रशासकीय अधिकारी यांनी देखील अहोरात्र काम करुन हे काम पुर्णत्वास नेले. याशिवाय या काळात नागरीकांची काही प्रमाणात गैरसोय झाली असली त्यांनी जे सहकार्य केले ते खुप महत्वाचे आहे, याबद्दल या सर्वांचे  मनापासून आभार!'

 

तर या ट्विटला भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून उत्तर देण्यात येत आहे. त्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की चांदणी चौकाच्या कामासाठी सर्व भाजपच्या नेत्यांनी प्रयत्न केले. खासदार सुळे या विनाकारण याचे श्रेय घेत आहेत असंही म्हटले आहे.

टॅग्स :BJPभाजपाNitin Gadkariनितीन गडकरीSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेस