राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर प्रकृती अस्वस्थतेमुळे रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 20:38 IST2020-07-19T20:38:10+5:302020-07-19T20:38:33+5:30
पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर प्रकृती अस्वस्थतेमुळे रुग्णालयात दाखल
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर सिंहगड रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, इतके दिवस उपचार घेऊनदेखील प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना अखेर रुबी हॉल क्लिनिकमध्ये शनिवारी दाखल करण्यात आले आहे..
रुपाली चाकणकर यांनी काही दिवसांपूर्वी जालना दौरा केला होता. तिथून परतल्यानंतर त्यांना शारीरिक थकवा जाणवत होता. म्हणून उपचारासाठी सिंहगड रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र या कालावधीत त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्यांना शनिवारी उशिरा रुबी हॉल क्लिनिक येथे हलवण्यात आले. या दरम्यान त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच काळजी करण्याचे काही कारण नाही, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.