शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दौंड जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीची बाजी, पंचायत समितीत भाजप विजयी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 21:19 IST

दरम्यान दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी निकालानंतर एकच जल्लोष केला.

दौंड जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीने (अजित पवार) सात पैकी सहा जागा जिंकून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निर्विवादपणे विजय मिळवला तर पंचायत समिती गणात १४ पैकी आठ जागांवर भाजपने विजय मिळवला. दरम्यान दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी निकालानंतर एकच जल्लोष केला.

जिल्हा परिषदेचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे -राहू - खामगाव : सागर शेलार (राष्ट्रवादी), वरवंड - नानगाव : गायत्री खळदकर (१५१७६) ( राष्ट्रवादी), गोपाळवाडी - खामगाव : साहेबराव पोळ(१०६८१) (राष्ट्रवादी), खडकी -देऊळगावराजे : वीरधवल जगदाळे(४७११) ( राष्ट्रवादी), पाटस-- कुरकुंभ : अनुराधा शितोळे (१३४३०) (राष्ट्रवादी), बोरीपार्धी -केडगाव: तुषार थोरात (१४७७७)  (राष्ट्रवादी), यवत - बोरीभडक: अविनाश कुदळे  (१२७०५)(भाजपा), 

दौंड पंचायत समिती गणासाठी विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे. राहू : शुभांगी शिंदे (भाजपा), यवत : तेजस्विनी पडळकर  (भाजपा), बोरीपार्धी : रेखा चौधरी  (भाजपा), देऊळगावराजे : अमृता गिरमकर (भाजपा), कुरकुंभ : राहुल भोसले (भाजपा), गोपाळवाडी : सुमन निकाळजे(भाजपा), खामगाव : सुखदेव चोरमले(भाजपा), बोरीभडक : साक्षी मस्के (भाजपा)   केडगाव : धनंजय शेळके (राष्ट्रवादी ), खडकी : संजय भोसले (राष्ट्रवादी), खामगाव : सुखदेव चोरमले (राष्ट्रवादी), कानगाव : बाळासाहेब निंवगुणे (राष्ट्रवादी), पारगाव : मनीषा ताकवणे (राष्ट्रवादी), वरवंड : प्रदीप दिवेकर (राष्ट्रवादी). 

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रेवणनाथ लबडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अरुण शेलार यांनी काम पाहिले. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेत यश मिळालं तर पंचायत समितीत भाजपाला यश मिळाला आहे तेव्हा आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात यांना चिंतन करणारी बाब आहे.गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार राहुल कुल समर्थक पॅनलला जिल्हा परिषदेला एक जागा तर पंचायत समितीला एक जागा मिळाली होती मात्र यावेळी जिल्हा परिषदेला भाजपला एक जागा मिळाली तर  पंचायत समितीत आठ जागा मिळाल्याने भाजपाच्या सात जागा वाढल्या आहेत.

दरम्यान आमदार राहुल कुल यांना स्वतःच्या हक्काच्या राहू गटातील उमेदवाराचा  पराभव झाल्याने  ही बाब राजकीय दृष्ट्या राहुल कुलांना आत्मपरीक्षण करणारी आहे. तसेच जिल्हा परिषदेत इतर सहा गटात राहुल कुल यांच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले हे देखील त्यांच्या दृष्टिकोनातून चिंतनाची बाब आहे  माजी आमदार रमेश थोरात  यांनी स्वतःच्या मतदारसंघात त्यांचे चिरंजीव तुषार थोरात यांना आघाडीचे मत घेऊन विजय मिळवल्याने रमेश थोरात यांनी स्वतःच्या गटावर वर्चस्व ठेवले आहे. तसेच पंचायत समितीला पराभवला सामोरे जावे लागल्यामुळे रमेश थोरात यांनी देखील आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.

वैशाली नागवडे यांचे ठिया आंदोलन -यवत -बोरीभडक  गटासाठी फेर मतमोजणी करण्यात यावी म्हणून राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश थोरात, वैशाली नागवडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राच्या बाहेर ठिय्या आंदोलन केली होते. यावेळी काही काळ शांततापूर्ण तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आली मात्र फेर मतमोजणी झाली नसल्याची वस्तुस्थिती होती.

English
हिंदी सारांश
Web Title : NCP Dominates Daund Zilla Parishad, BJP Wins Panchayat Samiti

Web Summary : NCP secured a majority in Daund Zilla Parishad. BJP triumphed in Panchayat Samiti elections. Celebrations erupted post-results, prompting introspection for key leaders after mixed outcomes.
टॅग्स :ZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५NCPराष्ट्रवादी काँग्रेसpanchayat samitiपंचायत समितीElectionनिवडणूक 2026BJPभाजपा