शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
3
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
4
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
5
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
6
Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
7
देशात कर दहशतवाद थांबवला पाहिजे; सत्तेत येताच कुठल्या ५ गोष्टी उद्धव ठाकरे करणार?
8
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
9
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
10
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
11
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
12
Maharashtta Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
13
मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?
14
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
15
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
16
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
17
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
18
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद
19
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
20
Success Story: ₹८५० च्या पगारावरून ₹५५,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, नशीब बदलणाऱ्या उद्योजकाची कहाणी

आढळरावांनी भेट घेतली, पण दिलीप मोहितेंचा विरोध कायम; राजकीय भूमिकेबाबत मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 7:52 PM

शिवाजी आढळराव यांनी घेतलेल्या भेटीनंतरही दिलीप मोहिते पाटील हे आपल्या भूमिकेवर ठाम असून त्यांनी पक्षाला आक्रमक इशारा दिला आहे.

NCP Dilip Mohite Patil ( Marathi News ) :शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून गेल्या काही दिवसांपासून महायुतीत रणकंदन सुरू आहे. शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांच्यासोबत गेल्याने राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून या मतदारसंघात उमेदवाराचा शोध सुरू आहे. या मतदारसंघातून तीन वेळा खासदार राहिलेल्या शिवाजी आढळराव पाटील यांनाच शिवसेनेतून आपल्या पक्षात घेत उमेदवारी देण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून सुरू असल्याचं दिसत आहे. मात्र आढळराव पाटलांच्या उमेदवारीच्या चर्चेने दुखावलेले राष्ट्रवादीचे खेडमधील आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली. त्यामुळे काल आढळराव यांनी मोहिते पाटलांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मात्र या भेटीनंतरही मोहिते पाटील हे आपल्या भूमिकेवर ठाम असून त्यांनी पक्षाला आक्रमक इशारा दिला आहे.

"मला राजकारणात जे काही मिळालं ते अजित पवार यांच्यामुळे मिळालं, याची जाणीव मला आहे. ते माझ्यासाठी सर्वस्व आहेत. मी शरद पवार यांची साथ सोडून त्यांच्यासोबत आलो आहे. त्यामुळे शिवाजी आढळराव यांना अजित पवारांनी उमेदवारी दिली तर मी शरद पवार यांच्या पक्षात न जाता राजकीय निवृत्ती घेईन," अशी घोषणा दिलीप मोहिते यांनी केली आहे.

"महायुतीत जाताना पक्षाने विश्वासात घेतलं नाही" 

शिवाजी आढळराव यांच्याविषयी नाराजी व्यक्त करताना आणि महायुतीत सामील होण्याच्या अजित पवारांच्या निर्णयावर निशाणा साधताना दिलीप मोहिते पाटील यांनी म्हटलं की, "शिवाजी आढळराव आणि आमच्यात राजकीय मतभेद आहेत. राजकारण तत्वाने केलं तर अडचण येत नाही, मात्र खुनशीने राजकारण केलं, दुसऱ्याला संपवायचं, तुरुंगात टाकायचं, असं राजकारण केलं तर ते टिकत नाही. शिवाजी आढळराव यांनी माझ्याबाबत तेच केलं. एकदम टोकाचं राजकारण त्यांनी केलं. म्हणून त्यांना माझा विरोध आहे. हे त्यांनी माझ्यासोबत एक-दोन दिवस नाही तर २० वर्ष असंच केलं. त्यामुळे त्यांची संगत नकोच, अशी माझी आणि माझ्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे. महायुतीत सामील होताना पक्षाने आम्हाला विश्वासात घेतलं नाही. आपल्याला हवे ते अधिकारी मिळतील, निधी मिळेल, महामंडळे मिळतील, अशी गाजरे दाखवण्यात आली. सत्तेत सामील झाल्यावर आज नेमकं काय झालं? फक्त नऊ लोकांना संधी मिळाली. एकत्रित बैठकाही कधी झाल्या नाहीत. या सगळ्या गोष्टींचा त्रास माझ्यासारख्याला त्रास होतो. त्यामुळे माझी भूमिका कायम आहे," असं मोहिते यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, "खेड तालुका राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे आणि तुम्ही आम्हाला विश्वासात न घेता काही गोष्टी करणार असाल तर जे घडेल, त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही. शिवाजी आढळराव यांच्या बाबतीत आमचे टोकाचे मतभेद आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना साध देऊ, असं गृहित धरू नये," असंही दिलीप मोहिते यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :shirur-pcशिरूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळराव