पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीचे वैद्यकीय पथक रवाना : शरद पवार उपस्थित 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 02:46 PM2019-08-12T14:46:39+5:302019-08-12T14:48:55+5:30

सांगली व कोल्हापूर येथील महापूर ओसरल्यावर येणाऱ्या साथींच्या आजारापासून नागरिकांना लागणाऱ्या वैद्यकीय मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे वैद्यकीय पथक  पुण्यातून रवाना झाले

NCP medical team leaves for help of flood victims of Kolhapur and Sangli | पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीचे वैद्यकीय पथक रवाना : शरद पवार उपस्थित 

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीचे वैद्यकीय पथक रवाना : शरद पवार उपस्थित 

Next

पुणे : सांगली व कोल्हापूर येथील महापूर ओसरल्यावर येणाऱ्या साथींच्या आजारापासून नागरिकांना लागणाऱ्या वैद्यकीय मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे वैद्यकीय पथक पुण्यातून रवाना झाले. या पथकाला अध्यक्ष शरद पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी डॉक्टर्स सेलचे डॉ. नरेंद्र काळे, पुणे शहराध्यक्ष डॉ सुनील जगताप उपस्थित होते. 

 मागील आठवड्यापासून सांगली,कोल्हापुर परिसरामध्ये  पावसामुळे भयानक परिस्थिती उदभवली आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याचे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. आता पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र पाणी ओसरल्यावर विविध आजार पसरण्यास सुरुवात होवू शकते. अशावेळी गावागावात मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय मदत लागणार आहे .यासाठी राष्ट्रवादीतर्फे सुमारे ३०० डॉक्टर सेवेत सामील झाले आहेत.डॉक्टरांसह औषधे आणि इतर वैद्यकीय सामुग्रीही पाठवण्यात आली आहे. या पथकात पुढे मिरज आणि जवळील भागातील डॉक्टरही सहभागी होणार आहेत. 

यावेळी खासदार वंदना चव्हाण , प्रदीप गारटकर, संजोग वाघेरे ,पुणे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष चेतन तुपे, अंकुश काकडे, दिलीप बराटे इ. सह अनेक डॉक्टर आणि पदाधिकारी उपस्थित होते.  

Web Title: NCP medical team leaves for help of flood victims of Kolhapur and Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.