शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात राष्ट्रवादी नगरसेवकाच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 14:23 IST

पती आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या मुलाने एका महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

पुणे : पती आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या मुलाने एका महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समीर बंडुतात्या गायकवाड (रा. मुंढवा गाव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुंढवा येथे राहणाऱ्या एका ३२ वर्षाच्या महिलेने मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. समीर गायकवाड याचे भाजी घेण्यासाठी फिर्यादीच्या घरी येणे जाणे होते. सुमारे दीड वर्षापूर्वी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी या घरात एकट्या असताना आरोपी घरी आला. किचनमध्ये त्याने फिर्यादी यांच्या कंबरेस पकडले. त्यांनी विरोध केल्यावर तुझ्या नवऱ्याला व मुलांना जीवे मारण्याची, तुमचे खानदान संपवून टाकीन, अशी धमकी दिली. या धमकीमुळे तिने कोणाला हा प्रकार सांगितला नव्हता. त्यानंतर १७ डिसेबर २०२१ रोजी दुपारी २ वाजता समीर गायकवाड हा फिर्यादी यांच्याशी पुन्हा जबरदस्तीने शरीरसंबंध करीत होता. त्यावेळी फिर्यादीचे पती व मुलाने हा प्रकार पाहिला. तेव्हा त्याने त्यांना मारण्याची धमकी देऊन निघून गेला. या प्रकारानंतर आता त्यांनी मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी समीर गायकवाड याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, नगरसेवक सुनिल ऊर्फ बंडु जयवंतराव गायकवाड यांनी आपल्याकडून जबरदस्तीने खंडणी मागितल्याचा आरोप करीत मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, आपला मुलगा समीर हा १७ डिसेबर २०२१ रोजी भाजी खरेदी करण्यासाठी गेला असता विवाहितेच्या पतीने त्यास घरात बोलावून चहा दिला व तो बाहेर गेला. तेव्हा समीर हा त्याच्या पत्नीशी बोलत असताना त्याने तिचा विनयभंग केला असे खोटे भासवून समीर याच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार देण्याची भिती दाखवून व त्यांच्या प्रतिष्ठेस बाधा आणण्याची भिती दाखवली. ही विवाहिता, तिचा पती, मुलगा व त्यांची आई, भाऊ यांनी आपल्याला जबरदस्तीने ३ लाख रुपये देण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मुंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक