शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे लोकसभेसाठी NCP चा उमेदवार ठरला; मविआच्या बैठकीत निर्णय घेऊ, जयंत पाटलांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 12:56 IST

पाटील पुढे म्हणाले, कर्नाटक आणि इतर राज्यातील निवडणूकांमध्ये आम्ही राष्ट्रीय पक्ष हा दर्जा पुन्हा सहज मिळवू...

पुणे : काल राष्ट्रीय निवडणूक आयोगाने देशातील तीन पक्षांचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला. त्यामध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश आहे. या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, देशातील वेगवेगळ्या राज्यात निवडणूका झाल्या. त्यानंतर काही पक्षांबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. फक्त राष्ट्रवादीबाबत असा निर्णय घेण्यात आला आहे असे नाही. वेगवेगळ्या राज्यात मते घेण्यात काही कमतरता आली असेल, पण येणाऱ्या निवडणूकांमधे हा दर्जा पुन्हा मिळेल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

पाटील पुढे म्हणाले, कर्नाटक आणि इतर राज्यातील निवडणूकांमध्ये आम्ही राष्ट्रीय पक्ष हा दर्जा पुन्हा सहज मिळवू. हा पक्षासाठी सेटबॅक नाही. कारण राज्यात पक्षाचे घड्याळ हे चिन्ह कायम आहे. येत्या तीन- चार महिन्यांत हा दर्जा पुन्हा मिळेल. काही पक्षांची काही काळासाठी क्रेझ असते. आप या पक्षाने अनेक आश्वासनं दिली त्यानंतर त्यांचा पक्ष वाढला. आम्ही मात्र शक्य तेवढीच आश्वासने देतो. लोकांच्या पैशांवर आश्वासने देणे असे आम्ही करत आहोत नाही. आपने पंजाबमधे जी आश्वासने दिली ती पुर्ण होतायत का हे बघितलं पाहिजे, असंही पाटील म्हणाले.

अदानींच्या प्रकरणात चौकशीला विरोध नाही

राष्ट्रवादीकडून भाजपच्या बाजूने कोणतीही भुमिका घेतलेली नाही. भाजप स्वतः तशी समजत करुन घेत असेल. अदानींच्या प्रकरणात चौकशीला विरोध नाही. फक्त जेपीसीच्या उपयोगाबद्दल शंका असल्यानेच पवार साहेबांनी ते वक्तव्य केलं. सावरकर हे महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून सावरकरांबाबत भुमिका घेण्यात आली आहे, असं पाटील म्हणाले.

प्रशांत जगताप पुणे लोकसभा लढणार?

प्रशांत जगताप हे चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांना लोकसभेची निवडणूक उमेदवारी मिळावी अशी आमच्या पक्षातील अनेकांची इच्छा आहे. अर्थात जर निवडणूक होणार असेल तर प्रशांत जगताप यांना उमेदवारी मिळावी अशी आमच्या पक्षाची मागणी आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत याबाबत आम्ही चर्चा करु. चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेबद्दल केलेल्या विधानावर विश्वास कसा ठेवायचा? कारण त्याला खूप वर्ष झाली आहेत. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार