शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

अजित पवार यांचा नामोल्लेख न केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 11:55 IST

अजित पवार यांनी पुणे महापालिकेला 312 कोटी रुपये मिळवून दिले.

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी, शासनाकडून पुणे महापालिकेला ३१२ कोटी रुपये मिळवून दिले. परंतु, याची माहिती देताना स्थायी समितीच्या अध्यक्षांनी पवार यांच्या नावाचा साधा उल्लेख देखील केला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे.         स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे म्हणाले,  कोरोना आपत्तीच्या काळात कुठलेही राजकारण न करता, आर्थिक संकटात सापडलेल्या पुणे महापालिकेस मदत करण्यासाठी अजित पवार पुढे आले. कोरोनामुळे सर्व यंत्रणा ठप्प झाल्याने महापालिकेचे आर्थिक मार्ग बंद झाले आहेत. अशावेळी महापालिकेला राज्य सरकार कडून जीएसटीचे ३१२ कोटी रुपये मिळाले असल्याने खुप मोठा दिलासा मिळाला आहे . परंतु स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्या नावाचा साधा उल्लेखही केला नाही. रासने यांनी मनाचा मोठेपणा दाखवून पालकमंत्री यांचे नाव घेणे आवश्यक होते, अशी नाराजी चांदेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व्यक्त केली .       पालकमंत्री अजित पवार यांनी महापौर हे अतिशय चांगले काम करत आहे, म्हणून महापौर यांचे मनापासून कौतुक केले. अशावेळी कोणतेही प्रकारचे राजकारण न करता रासने यांनीही मनाचा मोठेपणा दाखविला असता तर खूप बरे वाटले असते असेही चांदेरे म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपा