शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

पुणे जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पुरस्कृत सहकार पॅनेलची बाजी; भाजपचा प्रथमच शिरकाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 14:37 IST

जिल्हा बँकेच्या या निवडणुकीमध्ये 21 पैकी 14 संचालक बिनविरोध निवडून आले होते....

पुणे:पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीमध्ये 21 पैकी 19 जागा राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस पुरस्कृत सहकार पॅनेल जिंकून बाजी मारली. तर भाजपचा जिल्हा बँकेत प्रथमच शिरकाव झाला असून दोन जागांवर त्यांनी विजय मिळवला आहे. बँका पतसंस्था या क वर्ग गटामध्ये अटीतटीची लढत होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश घुले यांच्यावर भाजपचे प्रदीप कंद यांनी 14 मतांनी मात केली. 

जिल्हा बँकेच्या या निवडणुकीमध्ये 21 पैकी 14 संचालक बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित सात जागांसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज झाली. विद्यमान संचालक आत्माराम कलाटे. मुळशी, प्रकाश म्हस्के. हवेली. तज्ञ संचालक सुरेश घुले, हवेली यांना पराभव पत्करावा लागला. 

मुळशी तालुक्यात व विद्यमान संचालक आत्माराम कलाटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील चांदेरे यांच्यात लढत झाली चांदेरे 27  मते घेऊन विजयी झाले तर कलाटे यांना 18 मते मिळाली. हवेली तालुक्यातील जोरदार रस्सीखेच झाली राष्ट्रवादी काँग्रेसने येथे मैत्रीपूर्ण लढत घोषित केली होती यामध्ये विकासनाना दांगट 73 मते घेऊन विजय झाले. तर प्रकाश म्हस्के यांना 58 मते मिळाली. शिरूर तालुक्यामध्ये आमदार अशोक पवार यांचा एकतर्फी विजय झाला. पवार यांना 109 तर त्यांचे प्रतिस्पर्धी आबासाहेब चव्हाण यांना 21 मते मिळाली. 

बँका पतसंस्थांसाठी असलेल्या क वर्ग गटामध्ये भाजपचे प्रदिप विद्याधर कंद यांनी जोरदार मुसंडी मारून विजय मिळवला. कांदा यांना 405 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश घुले यांना 391 मते मिळाली. इतर संस्थांच्या ड वर्ग गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी मोठा विजय मिळवला दुर्गाडे यांना 948 तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे दादासाहेब फराटे यांना 265 मते मिळाली. 

महिला प्रवर्गातील दोन जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा बुट्टे पाटील आणि निर्मला जागडे विजयी झाल्या बुट्टे पाटील यांना 2749 तर जागडे यांना 2488 मते मिळाली. भाजपच्या आशा बुचके पराभूत झाल्या त्यांना 933 मध्ये मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब तावरे यांनी विजयी उमेदवारांची घोषणा करून त्यांना प्रमाणपत्र वाटप केले. जिल्हा बँकेतील संचालकांचे पक्षीय बलाबल या प्रमाणे-राष्ट्रवादी काँग्रेस.... अजित पवार( बारामती ) दिलीप वळसे पाटील( आंबेगाव) रमेश थोरात (दौंड)  अशोक पवार (शिरूर) दिलीप मोहिते (खेड ) संजय काळे (जुन्नर)  माऊली दाभाडे (मावळ)  सुनील चांदेरे (मुळशी)  रेवणनाथ दारवटकर (वेल्हे.) दत्तात्रेय भरणे (पणन प्रक्रिया संस्था ब गट) प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे (ड गट) संभाजी होळकर (ओबीसी ) दत्तात्रेय येळे (भटक्या विमुक्त जाती.) प्रवीण शिंदे (अनुसूचित जाती.) पूजा बुट्टेपाटील (महिला) निर्मला जागडे( महिला) 

काँग्रेस.... संग्राम थोपटे (भोर) संजय जगताप (पुरंदर) 

भाजप.... अप्पासाहेब जगदाळे (इंदापूर) प्रदीप कंद (बँका पतसंस्था) 

तीन दादांचा जयजयकार.... बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना अल्पबचत भवनात या बाहेर कार्यकर्ते आणि समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती या गर्दी मध्ये अजितदादा...आढळराव दादा..आणि प्रदीपदादा..अशा घोषणांचे  जोरदार युद्ध रंगले. गुलाल आणि भंडाऱ्याची तुफान उधळण झाली या घोषणाबाजीत पोलिसांना वारंवार हस्तक्षेप करावा लागला.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBaramatiबारामतीIndapurइंदापूर