शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही ; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 16:50 IST

ष्ट्रवादी काँगेसचे आमदार अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात नवा कलगीतुरा रंगण्याची शक्यता निर्माण झाली असून 'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही' असा टोला पवार यांनी पाटील यांना लगावला आहे. 

पुणे : राष्ट्रवादी काँगेसचे आमदार अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात नवा कलगीतुरा रंगण्याची शक्यता निर्माण झाली असून 'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही' असा टोला पवार यांनी पाटील यांना लगावला आहे. 

पुण्यात ते पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आयोजित जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी विविध मुद्दयांवर संवाद साधला. पाटील यांनी राष्ट्रवादीला गृहखाते देऊ नये कारण ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरा लावतील असे वक्तव्य केले होते. त्यावर पवार यांनी बोलताना, 'आम्ही त्यांचं सरकार असताना असं काहीही वक्तव्य केले नाही. १०५ जागा निवडून येवूनही  त्यांचं सरकार बनलं नाही याच त्यांना दुःख आहे. अधिवेशन काळातही त्यांनी काही व्यक्तव्य केली होती, ज्याला ठाकरे यांनी उत्तर दिले होते. मात्र त्यांच्यासाठी त्यांनी  'चोराच्या मनात चांदणे' किंवा 'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही' अशी म्हणही त्यांनी वापरली. यावेळी पक्ष देईल ते पद स्वीकारण्यास तयार असून राष्ट्रवादीला एखादे महत्वाचे खाते मिळू शकते असे सूचक विधानही त्यांनी केले. 

 कर्जमाफीचा श्रेय घेण्याचा कोणताही वाद महाविकास आघाडीत नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवरही त्यांनी भाष्य केले. याबाबत मुंबईत बोलणे झाले असून तीनही पक्षांच्या प्रमुखांनी निर्णय घेतला असल्याचे सांगितले. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या विचारांच्या स्थानिक पक्षप्रमुखांकडून एकत्र बसून निर्णय घेण्यात येणार असून तिथे एकमत नाही झालं तर वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी म्हटले. 

मी आणि हर्षवर्धन पाटील दुश्मन नाही 

मी प्रोटोकॉल पाळणारा माणूस आहे. त्यामुळे माझ्या नावाची पाटी सरकवून त्याआधी प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून बाळासाहेब थोरात यांच्या नावाची पाटी ठेवली. पाटील यांच्याशेजारी बसून राजकारणाव्यतिरिक्त बोलणे झाले, आमची राजकीय भूमिका वेगळी असली तरी आम्ही एकमेकांचे दुश्मन नाही असेही सांगायला ते विसरले नाहीत. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण