शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस उरले तरी वडगावशेरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी ' पोरका '

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 20:25 IST

माजी आमदार बापू पठारे व नगरसेवक सुनील टिंगरे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणुक लढण्यास इच्छुक

ठळक मुद्देयेत्या गुरूवारी (दि.3) मुळीक निवडणुक अर्ज भरणारमाजी आमदार बापू पठारे व नगरसेवक सुनील टिंगरे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणुक लढण्यास इच्छुक

पुणे: विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस उरले आहेत. मात्र, अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारांची नावे प्रसिध्द करण्यात आली नाहीत. त्यामुळे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघासह सर्वच मतदार संघातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. परंतु, बुधवारी रात्री उशीरा राष्ट्रवादीची उमेदवार यादी प्रसिध्द केली जाईल, असे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.वडगावशेरी मतदार संघातून भारतीय जनता पक्षातर्फे आमदार जगदीश मुळीक यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली असून येत्या गुरूवारी (दि.3) मुळीक निवडणुक अर्ज भरणार आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वडगावशेरीतून कोण निवडणुक लढवणार याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. माजी आमदार बापू पठारे व नगरसेवक सुनील टिंगरे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणुक लढण्यास इच्छुक आहेत. काही दिवसांपूर्वी दोघांची संयुक्तिक बैठक झाली. त्यात ज्याला पक्षाकडून उमेदवारी मिळेल,त्याच्यासाठी काम करायचे,असे दोघांमध्ये निश्चित झाले आहे. मात्र, निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास येत्या शुक्रवारपर्यंत (दि.4) मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्स्कूतचे वातावरण आहे.वडगावशेरी विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची संख्या कमी आहे.त्यातच निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी उमेदवारांना फारच कमी दिवस मिळणार आहेत.परंतु,पक्षाकडून उमेदवारी जाहीर न झाल्याने आपल्याला कोणत्या उमेदवाराचा प्रचार करायचा आहे, याबाबत नगरसेवक व पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.----------राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे म्हणाले,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.पुण्यासह राज्यातील सर्वच मतदार संघातील उमेदवारांची यादी रात्री उशीरापर्यंत प्रसिध्द होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूकBJPभाजपा