शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

भीमा कोरेगाव घटना : नक्षलवाद्यांनी रचला होता हिंसाचाराचा कट?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2018 7:38 AM

पुण्यातील भीमा-कोरेगावातील दलित संघटनांच्या आंदोलनामध्ये नक्षलवाद्यांचा हात असल्याची शंका सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

पुणे - पुण्यातील भीमा-कोरेगावातील दलित संघटनांच्या आंदोलनामागे नक्षलवाद्यांचा हात असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे. नक्षलवाद्यांनी भीमा-कोरेगावमध्ये सेमिनारचं आयोजन केले होते, अशीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाद निर्माण करुन व त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर दलित संघटनांच्या आंदोलनाचं लोण पसरावं, हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे म्हटलं जात आहे. भीमा कोरेगावातील हिंसाचार घडण्याच्या बरोबर एक दिवसापूर्वी मुंबईमध्ये नक्षल फ्रंट ऑर्गनायझेशनची बैठक 'एल्गार परिषद'चे सीलबंद करण्यात आलेल्या दस्तऐवजांच्या आधारे सुरक्षा यंत्रणांनी हा निष्कर्ष काढला आहे. 

'टाईम ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार,  एका पोलीस अधिका-यानं नाव न सांगण्याच्या अटीवरुन माहिती दिली की, 'सुरक्षा यंत्रणांच्या रिपोर्ट्सनुसार 31 डिसेंबर 2017 च्या दिवशी पुण्यातील शनिवार वाडामधील आयोजित एल्गार परिषदेत सहभागी झालेल्या लोकांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या नक्षलवाद्यांसोबत संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. पुढे ते असेही म्हणाले की, 'त्यामुळे अशा आंदोलनात एकतर नक्षलवादी  घुसतात तरी किंवा अशा प्रकारे  हिंसाचारही घडवतात. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत'.  

दरम्यान, हिंसक आंदोलनामध्ये डाव्या संघटनांचा हात असू शकतो, हे वृत्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाकारले आहे. मात्र दुसरीकडे या संघटनांच्या भूमिकेबाबत चौकशी करत असल्याची माहितीही त्यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया'सोबत संवाद साधताना दिली. 

भीमा कोरेगाव घटना : महाराष्ट्र बंदला हिंसक वळण

कोरेगाव भीमा (जि. पुणे) येथे सोमवारी (1 जानेवारी) झालेला हिंसाचार आणि वढू (बुद्रूक) येथे घडलेल्या अनुचित घटनेचे तीव्र पडसाद बुधवारी (3 जानेवारी) महाराष्ट्रभर उमटले. या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला मुंबई ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीचे गालबोट लागले. जमावाने केलेल्या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी व बसचे चालक गंभीर जखमी झाले, तर नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे शीघ्रकृती दलाच्या जवानांनी केलेल्या मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.आंबेडकरी कार्यकर्ते सकाळपासूनच मोठ्या संख्यने रस्त्यांवर उतरल्याने सगळीकडे चक्का जाम झाला. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह सर्व मार्गावरील ठिय्या आंदोलने आणि ठिकठिकाणी रेलरोकोमुळे मुंबईची चहूबाजुंनी कोंडी झाली. चेंबूर नाका येथे स्कूलबसवर झालेल्या दगडफेकीनंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले. कोल्हापुरात भीमसैनिक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाला.

जमावाने शेकडो वाहनांची जाळपोळ केली. बीड आणि चंद्रपूरमध्ये भाजपा आमदारांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, तर पुण्यात हिंदू जनजागरण समितीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांच्या घरावर जमाव चालून गेला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनुचित घटना टळली. राज्यभर संतप्त पडसाद उमटत असतानाही पोलिसांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळत आंदोलन चिघळू दिले नाही. सायंकाळी ४ वाजता अ‍ॅड. आंबेडकर यांनी बंद मागे घेत असल्याची घोषणा केली. मात्र, तोपर्यंत राज्यभर असंतोषाचा भडका उडालेला होता.

कोणाचीही गय नाहीकोरेगाव-भीमा येथे जी काही घटना घडली आहे, त्याची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. याप्रकरणी सखोल चौकशी करून जो कुणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यात कुणाचीही गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.अटक होईल ही अपेक्षाकोरेगाव भीमामधील हिंसेला जबाबदार असलेले शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना अटक केली जाईल, अशी अपेक्षा बाळगून आम्ही हा बंद मागे घेत आहोत. बंदसाठी आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल मी जनतेचे अभिनंदन करतो, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रnaxaliteनक्षलवादी