नवकलिकांचा, नवसुमनांचा बहर घेऊनी आला
By Admin | Updated: February 1, 2017 04:31 IST2017-02-01T04:31:21+5:302017-02-01T04:31:21+5:30
वसंतपचंमी म्हणजे वसंताच्या आगमनाचा दिवस. या दिवसापासून झाडांना नवी पालवी फुटू लागते. आंब्याला मोहोर येतात, झाडांना फुले फुलू लागतात. हा दिवस

नवकलिकांचा, नवसुमनांचा बहर घेऊनी आला
- नीलेश काण्णाव, घोडेगाव
वसंतपचंमी म्हणजे वसंताच्या आगमनाचा दिवस. या दिवसापासून झाडांना नवी पालवी फुटू लागते. आंब्याला मोहोर येतात, झाडांना फुले फुलू लागतात. हा दिवस निसर्गाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. यावर्षी १ फेब्रुवारीला वसंतपंचमी साजरी होत आहे.
या दिवसापासून वातावरणात नवचैतन्य निर्माण होऊन उत्साह येत असतो. वसंतपंचमीला विद्येची देवी सरस्वतीची पूजा केली जाते. या दिवशी पिवळ््या रंगाचे कपडे घातले जातात, तसेच खाण्यातही पिवळे पदार्थ बनवले जातात. सतत आकर्षक वाटणारा निसर्ग वसंत ऋतूमध्ये लोभस वाटतो, या दिवसात निसर्ग माणसाला स्वत:कडे ओढून घेतो. वसंतामध्ये निसर्गात वेगवेगळे बदल होऊ लागतात. शिशिर ऋतूमध्ये वृक्षाची पाने गळून जातात व वसंतामध्ये वृक्षांना पुन्हा नवी पालवी फुटते. या ऋतूत झाडांना नवीन फुले, मोहोर येत असल्यामुळे फुलपाखरे, पक्षी, मधमाशा यांची रेलचेल झाडांवर दिसते. भारतात वेगवेगळ््या प्रदेशात निरनिराळ््या पद्धतीने वसंतपंचमी साजरी केली जाते. नृत्याची कला शिकविणाऱ्या संस्थेत विद्येची
देवता सरस्वतीची पूजा करण्याची
प्रथा आहे, हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे. वसंतपंचमी ही कामदेवतेच्या पूजेसाठीदेखील ओळखली जाते.