शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

श्रमिक वर्गाकडून राष्ट्र निर्माणाचे बहुमोल कार्य :मुक्ता टिळक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 6:55 PM

राष्ट्रीय कला अकादमीच्यावतीने कामगार दिनानिमित्त पुणे शहरामध्ये सुरु असलेल्या मेट्रोचे काम करणाºया कामगारांचा सन्मान करण्यात आला.

ठळक मुद्देमेट्रो कामगारांचा सन्मान   कामगार हा देशाचा महत्त्वाचा स्तंभ

पुणे : श्रमदान करून जे लोक देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावत आहेत, त्यांचा सन्मान होणे अतिशय आवश्यक आहे. मेट्रो हा पुण्यासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामध्ये कामगारांच्या श्रमाचे योगदान खूप मोठे आहे. याच हातांनी देशाची प्रगती होते. त्यामुळे कामगार हा देशाचा महत्त्वाचा स्तंभ आहे. त्यांच्याकडून राष्ट्र निर्माणाचे बहुमोल कार्य घडत आहे, असे मत महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय कला अकादमीच्यावतीने कामगार दिनानिमित्त पुणे शहरामध्ये सुरु असलेल्या मेट्रोचे काम करणाºया कामगारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, मेट्रोचे दिनेश गर्ग, प्रकाश कदम, संतोष पाटील, अकादमीचे मंदार रांजेकर, रोमा लांडे, योगिनी बागडे, योगेश गोलांडे,गणेश माने, जयवंत मोहने, अमर लांडे उपस्थित होते. पुणे मेट्रोचा पहिला स्तंभ असलेल्या कृष्णा हॉस्पिटल शेजारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भेटवस्तू आणि उपरणे देऊन कामगारांचा सत्कार करण्यात आला. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, शहराच्या जडणघडणीत कामगारांचे योगदान मोठे आहे. कामगार अतिशय प्रामाणिकपणे त्यांचे काम करीत असतात. परंतु दिवसभर काम केल्यानंतर थकवा घालविण्यासाठी व्यसनांचा आधार घेतात. मात्र त्यांनी व्यसनापासून दूर राहत स्वत:ची आणि कुटुंबियांची काळजी घ्यायला हवी. मंदार रांजेकर यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :PuneपुणेMukta Tilakमुक्ता टिळकMetroमेट्रो