शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

बारामतीत लक्ष्मण हाके यांच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक;जोडेमारो आंदोलन करीत केला निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 20:50 IST

काही उलटसुलट आरोप करून जनतेमध्ये गैरसमज निर्माण केले जात असतील, तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा समस्त बारामतीकरांनी दिला आहे.

बारामती : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केल्यानंतर बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांच्या विरोधात हाके यांनी बेताल वक्तव्य थांबविण्याची मागणी करीत बारामतीत आज राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी हाके यांचा बारामतीकरांच्या वतीने जाहीर निषेध करीत हाके यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, जिल्हा उपाध्यक्ष प्रताप पागळे, माजी नगरसेवक अमर धुमाळ, ॲड. धीरज लालबीगे, ‘छत्रपती’चे संचालक मंथन कांबळे, नीलेश टिळेकर, शहर उपाध्यक्ष नीलेश मोरे, किशोर सोलनकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर महिला अध्यक्षा अनिता गायकवाड, तालुका अध्यक्षा ज्योती लडकत, राष्ट्रवादी युवक काँग्रेस सचिव पार्थ गालिंदे, सामाजिक न्याय विभाग पुणे जिल्हा उपाध्यक्ष साधू बल्लाळ, कार्याध्यक्ष विशाल जाधव, उपसरपंच सागर देवकाते, विजया अलगी, अश्विनी तावरे, विशाल हिंगणे यासह कार्यकर्ते उपस्थित होते. राज्याचे उत्पन्न, खर्च आणि आवश्यकता बघून निधी वितरित केला जातो. एवढे प्रारंभिक ज्ञान हाके यांना नाही.

केवळ आरोप करून कोणी नेता होत नाही, हे हाके यांनी लक्षात ठेवावे. अजित पवार यांना मतदारांनी सर्वाधिक मतांनी निवडून दिले आहे. हेसुद्धा लक्षात ठेवावे. काही उलटसुलट आरोप करून जनतेमध्ये गैरसमज निर्माण केले जात असतील, तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा समस्त बारामतीकरांनी दिला आहे. सर्व राजकीय पक्षांच्या वरिष्ठांनी यामध्ये एकच निर्णय घेतला पाहिजे. तो म्हणजे कोणीही कोणत्याही व्यक्तीने वरिष्ठ नेत्यांवर बेताल वक्तव्य करेल, खालच्या पातळीवर टीका करेल, अशा माथेफेरूंना कोणत्याच पक्षाने थारा देऊ नये. प्रताप आबा पागळे(उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) प्रा.लक्ष्मण हाके हे प्रसिद्धीसाठी हपापलेले आहेत. आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर प्रसिद्धीसाठी खोटे आरोप केल्यास हाके यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. - नवनाथ बल्लाळ (माजी उपनगराध्यक्ष, बारामती)

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडlaxman hakeलक्ष्मण हाकेAjit Pawarअजित पवार