राष्ट्रवादी काँग्रेसला कॅन्टोन्मेंटमध्ये ंिखंडार

By admin | Published: December 13, 2014 12:11 AM2014-12-13T00:11:50+5:302014-12-13T00:11:50+5:30

पुणो कॅन्टोन्मेंट शाखेच्या अध्यक्षांसह आठही वॉर्डामधील ब्लॉक अध्यक्षांनी व अन्य पदाधिका:यांनी अशा 45 जणांनी पदाचे राजीनामे शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांच्याकडे दिले आहेत.

Nationalist Congress Party in the Cantonment | राष्ट्रवादी काँग्रेसला कॅन्टोन्मेंटमध्ये ंिखंडार

राष्ट्रवादी काँग्रेसला कॅन्टोन्मेंटमध्ये ंिखंडार

Next
पुणो : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणो कॅन्टोन्मेंट शाखेच्या अध्यक्षांसह आठही वॉर्डामधील ब्लॉक अध्यक्षांनी व अन्य पदाधिका:यांनी अशा 45 जणांनी पदाचे राजीनामे शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांच्याकडे दिले आहेत. त्यामुळे कॅन्टोमेन्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडल्याची बोलले जात आहे. 
या पक्षाच्या कॅन्टोन्मेंट शाखेचे अध्यक्ष संदीप भोसले म्हणाले, ‘‘स्वाभिमानाच्या मुद्दय़ावरून स्वतंत्र पक्ष स्थापन करणारे शरद पवार यांच्या पक्षात कार्यकत्र्याचा अपमान होत असल्याचा दावा करीत, वॉर्ड क्रमांक 3, 5 आणि 8 मधून स्थानिक कार्यकत्र्याशिवाय इतरांना, अन्य पक्षातील कार्यकत्र्याना संधी देण्यात आली आहे. वॉर्ड क्रमांक 8मधून पक्षाचे 3 कार्यकर्ते इच्छुक असताना वॉर्ड क्रमांक 3 मध्ये राहणा:या महिलेला संधी देण्यात आली. गरीब, नोकरदार, कार्यकर्ते पक्षाचे काम करीत असताना इतरांना उमेदवारी दिली गेल्याने अन्याय झाल्याची भावना आहे.
आपण कॅन्टोन्मेंट शाखेचे अध्यक्ष असताना उमेदवार निवडीच्या वेळी आपल्याला बोलावले गेले नाही. 
आमदार जयदेव गायकवाड व कार्याध्यक्ष सुनील बनकर यांनी परस्पर निर्णय घेतले. त्यामुळे सर्व वॉर्डामधील ब्लॉक अध्यक्ष, सर्व स्तरांतील पदाधिकारी यांनी राजीनामे देण्याचा निर्णय घेतला.
आमचे नेते अजित पवार यांनी याबाबत आमच्याशी चर्चा केली नाही, तर वेगळा निर्णय आम्ही घेऊ, असे भोसले यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)
 
4पुणो कॅन्टोन्मेंटच्या निवडणुकीसाठी 9क् पैकी 2 अपक्ष उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाले. अधिकृत उमेदवारांच्या दुपटीने, 59 अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. गुरूवारी रात्री उशिरार्पयत सुरू असलेल्या छाननीच्या वेळी वॉर्ड क्रमांक 1 मधील सुनीता ढोकडे यांचा अर्ज तसेच वॉर्ड क्रमांक 2 मधील लोबो अल्बर्ट फ्रान्सिस यांचा अर्ज बाद झाला. ढोकडे यांनी भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांकडून अर्ज भरले होते; मात्र त्यांना कोणत्याही पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली नाही. लोबो यांनी भरलेल्या 4 अर्जापैकी कोणत्याही अर्जावर त्यांची स्वाक्षरी नव्हती. सर्वाधिक 16 उमेदवार वॉर्ड क्रमांक 7 आणि 3 मध्ये असून त्याखालोखाल क्रमांक 8 मध्ये 14 जण, तर वॉर्ड क्रमांक 5 मध्ये 1क् जण, 6 मध्ये 6 आणि क्रमांक 2 मध्ये 14 व 1 मध्ये 5 जण रिंगणात आहेत. छाननीत अर्ज वैध ठरलेल्या 88 उमेदवारांपैकी 29 जण राजकीय पक्षांचे, तर 59 अपक्ष आहेत. 

 

Web Title: Nationalist Congress Party in the Cantonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.