शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

नॅशनल मेडिकल कमिशनच्या जाचक अटींचा निषेध, आयएमच्या संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 9:10 PM

देशभरातील 'आयएमए' च्या तीन लाख अ‍ॅलोपॅथिक डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत बंद ठेवून धिक्कार केला. यात पुण्यातील साडेचार हजार डॉक्टर सहभागी झाले होते.

ठळक मुद्देशहरातील साडेचार हजार डॉक्टर सहभागीएमएमसी या घटनात्मक परिषदेला बरखास्त करून केंद्र सरकार एनएमसी हे विधेयक सोमवारी लोकसभेत मंजुरीसाठी ठेवणारशहरात अ‍ॅलोपॅथिचे सुमारे ९ हजार डॉक्टर आहेत. त्यापैकी चार हजार ३०० डॉक्टर हे पुणे आयएमए शाखेचे सदस्य

पुणे : नँशनल मेडिकल कमिशनच्या विविध जाचक अटींचा इंडियन मेडिकल असोशिएशनच्या (आयएमए) वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.अधिवेशनात 'नॅशनल मेडिकल कमिशन' (एनएमसी) आरोग्यविषयक जे विधेयक मांडले जाणार आहे त्या विधयकाबरोबर एनएमसीचा विरोध आयएमएने शनिवारी पत्रकार परिषदेत केला. याच पार्श्वभूमीवर छेडण्यात आलेल्या कामबंद आंदोलनादेखील उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. शनिवारी देशभरातील 'आयएमए' च्या तीन लाख अ‍ॅलोपॅथिक डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत बंद ठेवून धिक्कार केला. यात पुण्यातील साडेचार हजार डॉक्टर सहभागी झाले होते. शहरात अ‍ॅलोपॅथिचे सुमारे ९ हजार डॉक्टर आहेत. त्यापैकी चार हजार ३०० डॉक्टर हे पुणे आयएमए शाखेचे सदस्य आहेत. त्यांनी शनिवारी सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत संपात भाग घेतला. अ‍ॅलोपॅथिक डॉक्टरांचे नियमन करणा-या 'मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया' (एमएमसी) या घटनात्मक परिषदेला बरखास्त करून केंद्र सरकार एनएमसी हे विधेयक सोमवारी लोकसभेत मंजुरीसाठी ठेवणार आहे. या विधेयकाला आयएमकडून विरोध होत आहे.  प्रस्तावित एनएमसी विधेयकात ब्रिज कोर्सचा समावेश केला आहे. याद्वारे बिगर अ‍ॅलोपॅथिक डॉक्टर (बीएएमएस, बीएचएमएस आदी) डॉक्टरांनी सहा महिन्याचा ब्रिज कोर्स केल्यास त्यांना अ‍ॅलोपॅथिची औषधे देता येणार आहेत. यामुळे क्रॉसपॅथी वाढेल. तसेच सध्या राज्य शासनाचे प्रत्येक खासगी वैद्यकिय महाविद्यालयांतील ८५ टक्के जागांवर नियंत्रण आहे. या विधेयकाद्वारे ते ४० टक्यावर आणण्यात येणार आहे. यामुळे उरलेल्या ६० टक्के जागा लाखो रुपए देउन गुणवत्ता नसलेल्या उमेदवारांना वाटण्यात येतील. यामुळे गरीब व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना डावलले जाईल असे मत यावेळी सदस्यांनी व्यक्त केले. यावेळी आयएमए चे अध्यक्ष डॉ. पदमा अय्यर, सचिव डॉ. राजकुमार शहा, डॉ. मिनाक्षी देशपांडे, खजिनदार डॉ.  डॉ. बी. एल. देशमुख, माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश मराठे तसेच डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. जयंत नवरंगे आदी उपस्थित होते

टॅग्स :Puneपुणेdoctorडॉक्टरmedicineऔषधंhospitalहॉस्पिटल