शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

चांदणी चौक उड्डाणपुलाचे काम लवकरच मार्गी लागणार;एनडीएच्या जागेची मोबदला रक्कम राष्ट्रीय महामार्ग देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 21:13 IST

मुंबई-बेंगलुरु महामार्गावरील चांदणी चौकात उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलासाठी भूसंपादनाचे काम काम सुरु आहे..

ठळक मुद्देस्थायी समितीच्या बैठकीमध्ये हमीपत्र देण्यास मान्यता पालिकेकडून होणार टप्प्याटप्प्याने परतफेड

पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीने चांदणी चौकातील उड्डाणपुलासाठी देण्यात येणाऱ्या ४८ हेक्टर जागेचा मोबदला रोख स्वरुपात मागितला आहे. मोबदल्याची ही रक्कम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एनडीएला देणार असून पालिका टप्प्याटप्प्याने त्याची परतफेड करणार आहे. तसेच हमीपत्र देण्यास स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आल्याची अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.मुंबई-बेंगलुरु महामार्गावरील चांदणी चौकात उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलासाठी भूसंपादनाचे काम काम सुरु आहे. याठिकाणी होणारी वाहतूक कोंडी दूर करण्याकरिता बहुपदरी उड्डाणपूलाची उभारणी करण्यात येत आहे. त्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले होते.  सुमारे ४५० कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी महापालिकेने भूसंपादन करून द्यायचे आहे.संरक्षण विभागाने एनडीएची पॉईंट ४८ हेक्टर जमीन देण्यास मान्यता दिली आहे. त्याचा रोख मोबदला पालिकेला द्यावा लागणार आहे. पालिकेकडे निधीची कमतरता असल्यास तुर्तास ही रक्कम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण संरक्षण विभागाला देणार असून प्रकल्पाचे काम झाल्यानंतर तसेच उड्डाणपूल पालिकेच्या ताब्यात आल्यानंतर टप्प्याटप्प्याने हे पैसे पालिका चुकते करणार आहे. उच्च स्तरीय बैठकीत पालिकेच्यावतीने दर्शविण्यात आलेल्या तयारीनुसार मंगळवारी हमीपत्र देण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.=======शहराच्या मध्यवस्तीमध्ये असलेल्या शिवाजीनगर, गोखलेनगर, संगमवाडी, कामगार पुतळा आदी भागातील पाणी पुरवठ्याची समस्या अद्यापही सुटलेली नाही. याभागाला टँकरसाठी पाणी पुरवठा करण्याकरिता २८ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली असून त्याला स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. मागील काही वर्षांपासून या भागातील पाणी प्रश्न बिकट बनला आहे. विशेषत: पोलीस वसाहतींचा पाणी प्रश्न जटील झाला आहे. पालिकेकडून एकीकडे समान पाणी पुरवठ्यासारखी योजनेचे काम सुरु असताना दुसरीकडे मात्र शहराच्या विविध भागात अद्यापही टँकरने पाणी पुरवठा केला आहे. स्थायी समितीने सहा महिन्यांसाठीची ही निविदा मान्य केली आहे.

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गkothrudकोथरूडPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका