शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

आयुषच्या धाडसाला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार; तलावात बुडणाऱ्या दोघांना वाचवून दिले ‘आयुष्य’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 16:42 IST

तलावात बुडत असलेल्या मुलांना पाहून १३ वर्षीय आयुष तापकीर याने स्वत:च्या जिवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली

नारायण बडगुजर 

पिंपरी : तलावात बुडत असलेल्या मुलांना पाहून १३ वर्षीय आयुष तापकीर याने स्वत:च्या जिवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली. तीन मुलांना पाण्याबाहेर काढले. त्यातील दोघांचा जीव वाचला. आयुषच्या या धाडसाने दोन मुलांना ‘आयुष्य’ दिले. त्याच्या या धाडसाचे कौतुक झाले. तसेच त्याला यंदाचा राष्ट्रीय स्तरावरील बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या लौकिकात भर पडली आहे.   आयुष तापकीर हा त्याच्या कुटुंबियांसह भोसरी येथील सद्गुरूनगर परिसरात वास्तव्यास आहेत. वडील गणेश, आई शीतल, मोठा भाऊ राेहीत, आजी ताराबाई व इतर असे त्यांचे एकत्र कुटुंब आहे. शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेती व्यवसाय असल्याने तापकीर कुटुंब गुरांच्या पालनाचा जोड व्यवसाय करतात. त्यात त्यांच्याकडे म्हशी, बैल, गायी आहेत. कोरोना काळात २०२१ मध्ये आयुष हा इयत्ता आठवीत शिकत होता. मात्र, शाळा बंद असल्याने मोबाइलवर ऑनलाईन क्लासला हजेरी लावत होता. २७ सप्टेंबर २०२१ रोजी ऑनलाईन क्लास झाल्यानंतर दुपारी आयुष हा म्हशींना तलावावर घेऊन गेला. त्यावेळी मुले पाण्यात बुडताना दिसली. जिवाची पर्वा न करता आयुषने तलावात उडी मारली. बुडणाऱ्या तीन मुलांना पाण्याबाहेर काढले. त्यातील एकाच्या पोटातील पाणीही पोट दाबून काढले. तीन मुलांपैकी दोघांचा जीव वाचवण्यात आयुष याला यश आले.   ‘लोकमत’ने केली होती अपेक्षा व्यक्त  

बाल्यावस्थेत असताना आयुष तापकीर याने दोन मुलांचा जीव वाचला. शौर्याचा अत्युच्च आदर्श त्याने निर्माण केला. अशा शौर्याचा गौरव म्हणून राष्ट्रीय स्तरावर बाल शौर्य पुरस्कार प्रदान केला जातो. राष्ट्रपतींच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाला हा पुरस्कार प्रदान केला जातो. या पुरस्कारासाठी आयुष याला सन्मानित करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त करणारे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी देखील त्याबाबतचे पत्र दिले होते.  

 दिल्लीत पुरस्कार वितरण  

आयुष तापकीर याची ‘राष्ट्रीय शौर्य पुरस्कार २०२१’ यासाठी निवड झाल्याचे सरकारच्या भारतीय बाल कल्याण परिषदेतर्फे कळविण्यात आले. दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी पुरस्काराचे वितरण होणार आहे. या सन्मानामुळे भोसरी गाव तसेच परिसरातून आनंद व्यक्त होत आहे.          

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPoliceपोलिसbhosariभोसरी