शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

‘आठ’ ऐतिहासिक घंटांमधून एकाचवेळी निनादणार राष्ट्रगीताचे सूर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 07:00 IST

१८८५ साली ब्रिटिशांनी इंग्लंडहून जहाजाने या ''आठ '''घंटा भारतात आणल्या गेल्या.

- दीपक कुलकर्णी - 

पुणे : देशभरात विविध ठिकाणी जल्लोषपूर्ण वातावरणात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. हे स्थळ आशिया खंडातील चर्चमधील सर्वात उंच टॉवर म्हणून ओळख प्राप्त करुन आहे. त्याठिकाणी तब्बल १ हजार किलोहून अधिक वजनाच्या आठ घंटा याठिकाणी आहेत. या ऐतिहासिक घंटांवर चार मुले एकत्रित येवून सप्तसुरांची मिलावट करत स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनाच्या वेळेला राष्ट्रगीत वाजवतात.. ते ऐतिहासिक वारसास्थळ आहे गुरुवार पेठेतील पंचहौद मिशन चर्च..रोमन कॅथोलिक पध्दतीने बांधण्यात आलेल्या पुण्यातील गुरुवार पेठेतील 'पंचहौद मिशन चर्च ' या ऐतिहासिक वारसास्थळाला ब्रिटिश राजवटीच्या कालखंडाची किनार आहे. १८८५ साली ब्रिटिशांनी इंग्लंडहून जहाजाने या आठ घंटा भारतात आणल्या गेल्या. त्या मुंबईच्या व्हिटी स्टेशनवर उतरवल्यानंतर पुण्यातील सॅलिसबरी चौकातील एका कारखान्यात सर्व घंटांची पॉलिश करुन त्या गुरुवार पेठेतील पवित्र नाम देवालय या चर्चमधील टॉवरवर प्रस्थापित केल्या. या घंटावर त्याकाळापासून बायबलमधील गाणी, प्रार्थना ख्रिसमस, येशू ख्रिस्ताच्या जन्मदिवशी, गुड फ्रायडे यांसारख्या उत्सवाला वाजविल्या जातात. तसेच इतर दिवशी दिवसाभरात तीनवेळा घंटानाद होतो. पूर्वीच्या काळी या घंटाचा आवाज काही कोसोदूर जात असत.  मात्र, सध्या परिसरातील उंचच उंच इमारती, ध्वनिप्रदूषण यांच्या कचाट्यात देखील हा आवाज कमी झालेला नाही. पूर्वी दोरीच्या साहाय्याने ह्या घंटा वाजवल्या जात होत्या. आता मुलेच ही घंटा वाजवण्याचे काम करतात. 

   विकास उमापती म्हणाले, १५ ऑ गस्ट आणि २६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनादिवशी या ऐतिहासिक घंटांवर राष्ट्रगीताचे वादन करण्यात येते. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात राष्ट्रप्रेमाची भावना जागविली जाते. या आजतागायत त्यांचे महत्व जपून आहेत. त्यांच्यामधून् निनादणारे जनगणमनचे सूर नागरिकांच्या मनाचा ठाव घेतात. परंतु, पूर्वी या घंटांचे ऑपरेटिंग हे व्हीलवरुन केले जात असत. मात्र, गेल्या काहीवर्षांंपासून चार मुले टॉवरवर चढून या घंटांमधील सप्त सुरांशी जुळवाजुळव करत राष्ट्रगीताचे वादन करतात. आशिया खंडातील सर्वात उंच टॉवर म्हणून नावलौकिक असलेल्या या स्थळाची मिळतीजुळती प्रतिकात्मक प्रतिकृती आज देखील इंग्लंडमध्ये वास्तव्याला आहे. 
 विकास उमापती यांच्यासह मनोज येवलेकर, अविनाश सुर्यवंशी यांचा आठ घंटामधून राष्ट्रगीत वाजविण्याच्या उपक्रमात समावेश असतो. तसेच या सर्वजणांचे या ऐतिहासिक घंटांची देखरेख व व्यवस्थापन पाहतात. 

टॅग्स :PuneपुणेEnglandइंग्लंडIndependence Dayस्वातंत्र्य दिनNational Anthemराष्ट्रगीत