शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नाशिक-पुणे उडान सेवा पुन्हा सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 7:12 PM

‘उडान’ ही सेवा डिसेंबर २०१७ मध्ये सुरू करण्यात आली. परंतु, मार्च २०१८ मध्ये ही सेवा काही कारणास्तव बंद करण्यात आली.

ठळक मुद्दे२१ जूनपासून प्रारंभ : नाशिक-दिल्ली विमानसेवा शुक्रवारपासून पुणे-नाशिकच्या नागरिकांना कमी वेळेत ये-जा करणे सोपे जाणार

पुणे : उडान अंतर्गत सुरू करण्यात आलेली पुणे-नाशिक (ओझर) विमान सेवा पुन्हा सुरू होणार आहे. एअर डेक्कन तर्फे येत्या २१ जून रोजी हे विमान ‘उडान’ घेणार आहे. त्यामुळे पुणेकरांना एका तासात नाशिकला पोहचता येणार आहे. देशातील सामान्य नागरिकांना विमान सेवेचा लाभ घेता यावा, यासाठी ‘उडान’ ही सेवा डिसेंबर २०१७ मध्ये सुरू करण्यात आली. परंतु, मार्च २०१८ मध्ये ही सेवा काही कारणास्तव बंद करण्यात आली होती. संरक्षण विभागाने पुणे विमानतळावर लॅँडिगसाठी तीन महिन्यांचीच परवानगी दिली होती. ही परवानगी संपल्यामुळे ही सेवा बंद करण्यात आली होती. परंतु, आता पुन्हा सेवा सुरू होत असून नाशिकहून सायंकाळी ६ वाजता निघणारे डीएन १९४ हे विमान पुण्यात ६.४५ वाजता पोहचेल. पुण्याहून हेच विमान ७.०५ वाजता नाशिककडे निघेल. तिथे ७.४५ मिनिटांनी पोहचेल.  याबाबत वाहतूक तज्ज्ञ धैर्यशिल वंडेकर म्हणाले,‘‘ही सेवा सामान्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. परंतु, काही काळासाठी ती बंद झाली होती. आता ती पुन्हा सुरू होत आहे. त्यामुळे पुणे-नाशिकच्या नागरिकांना कमी वेळेत ये-जा करणे सोपे जाणार आहे. पुणे-नाशिकसाठी या सेवेमुळे खूप फायदा होणार आहे. तसेच नाशिकहून आता दिल्लीला देखील येत्या १५ जून २०१८ पासून विमानसेवा सुरू होत आहे. त्यामुळे नाशिक-दिल्लीकरांसाठी ही आनंदाची बाब आहे.’’  

टॅग्स :PuneपुणेNashikनाशिकairplaneविमान