अरुंद रस्ते, वाहतूककोंडी, ड्रेनेजची दुरवस्था

By Admin | Updated: January 9, 2015 00:58 IST2015-01-09T00:58:25+5:302015-01-09T00:58:25+5:30

पाचगाव पर्वती वनविहाराला लागून असलेल्या प्रभाग क्रमांक ६९ मध्ये एकही सार्वजनिक प्रकल्प उभा राहिलेला नाही.

Narrow roads, transporters, drainage durations | अरुंद रस्ते, वाहतूककोंडी, ड्रेनेजची दुरवस्था

अरुंद रस्ते, वाहतूककोंडी, ड्रेनेजची दुरवस्था

पुणे/सहकारनगर : पाचगाव पर्वती वनविहाराला लागून असलेल्या प्रभाग क्रमांक ६९ मध्ये एकही सार्वजनिक प्रकल्प उभा राहिलेला नाही. पाणी कमतरता विभागामुळे प्रभागात अनधिकृत बांधकामे वाढल्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. ड्रेनेजची दुरवस्था, रस्त्यावर खड्डे व पावसाळी पाणी घरात घुसत असल्याने धनकवडीतील नागरिक त्रस्त आहेत.

प्रभाग क्रमांक ६९ ची भौगोलिक रचना टेकडी, पठार व उताराची आहे. त्यामुळे रस्ते, जलवाहिनी व ड्रेनेज टाकताना योग्य काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अनेकदा ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर पसरते. येथील रस्ते वरती आणि घरांचे ओटे खाली आहेत. त्यामुळे पावसाळ््यात थेट पाणी घरात घुसत आहे. रस्त्यावर पाणी साचत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन डेंगी व मलेरिया रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
तळजाई टेकडीचा भाग असल्याने या ठिकाणी अनेक वर्षे पाणी कमतरता विभागाचे आरक्षण होते. त्यामुळे केवळ ०.३३ इतक्या नगण्य बांधकामाला परवानगी असल्याने मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली. अनधिकृत बांधकामामुळे रस्ते अरुंद झाले. लोकसंख्या वाढल्यामुळे या भागात अरुंद रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. तसेच, पावसाळ््यात उताराचे रस्ते नादुरुस्त होऊन खड्डे पडले आहेत. तरीही अनेकदा भरधाव वाहने जातात. परंतु, बऱ्याच ठिकाणी स्पीड ब्रेकर (गतिरोधक) नाहीत. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत.
उतारावरून टाकण्यात आलेल्या ड्रेनेजच्या लाईन छोट्या आकाराच्या आहेत. त्यामुळे ड्रेनेजच्या लोखंडी झाकणातून पाणी रस्त्यावर पसरते. बाजूच्या घरात पाणी घुसून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे दूरगामी विचार करून वाहिनी टाकणे गरजेचे आहे, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
(वार्ताहर)

‘पावसाळी लाईन आणि गटारे याचे योग्य नियोजन न केल्यामुळे दर वर्षी आमच्या घरात पाणी शिरते. याबाबत महापालिका अधिकारी, स्थानिक नगरसेवक आणि आमदार यांच्याकडे वेळोवेळी गेलो. त्यानंतरही यावर कोणतीही उपाययोजना झालेली नाही.
- नीलेश खैरे,
रहिवासी, धनकवडी गावठाण

वनविभागाच्या संरक्षण भिंतीचे अपुरे काम झाले. त्यामुळे वनविहारात कचरा टाकणे, झाडे तोडून लाकडे गोळा करणे. अनेकदा तरुण मद्यपानासाठी वनविहाराचा वापर करताना दिसतात. तातडीने भिंतीचे काम पूर्ण न केल्यास वनविहाराला धोका निर्माण होऊ शकतो.
- जितेंद्र चव्हाण,
स्थानिक नागरिक.

संभाजीनगर, आदर्शनगर, शेलारनगर, तानाजीनगर या परिसरात एकही अधिकृत भाजी मंडई नाही. हा चढ आणि उताराचा भाग आहे. अरुंद रस्ते असून, कुठेही गतिरोधक नसल्याने रस्त्यावर अनेकदा अपघात होतात. वाहतूककोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
- अर्जुन शिर्के,
अध्यक्ष, जय महाराष्ट्र मित्र मंडळ.

नव्याने रस्ते तयार करताना कोणतीही काळजी घेतली जात नाही. खड्डे योग्य पद्धतीने बुजविले जात नाहीत. भविष्याचा विचार करून रस्ते, ड्रेनेज व जलवाहिनीची सुविधा दिली पाहिजे. वारंवार तिचे कामे केल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
- भैरु चौगुले,
सामाजिक कार्यकर्ते.

तळजाई व आंबेगाव पठार परिसरात पूर्वी तुरळक लोकवस्ती होती. परंतु, बांधकामे वाढल्यामुळे अचानक लोकसंख्या वाढली आहे. पूर्वीचे गावठाणात आखलेले रस्ते अपुरे पडत आहेत. त्यामुळे रस्ता रुंदीकरण करणे गरजेचे आहे.
- हनुमंत भोसले,
सामाजिक कार्यकर्ते.

कचऱ्याची गाडी वेळेवर आली नाही, तर नागरिक रस्त्याच्या बाजूला मोकळ््या जागेत बिनधास्तपणे कचरा टाकतात. नळजोड, रस्तेदुरुस्तीशिवाय एकही सार्वजनिक प्रकल्प प्रभागात उभारण्यात आलेला नाही.
- विजय क्षीरसागर,
सामाजिक कार्यकर्ते.

धनकवडी गावठाणात रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी साचते. त्याठिकाणी डासांची उत्पत्ती होते. उघड्यावर टाकलेल्या कचऱ्यामुळे मोकाट जनावरे व कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. मात्र, महापालिकेचे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे.
- श्रीरंग आहेर,
काँग्रेस.

प्रभागात ड्रेनेजची दुरवस्था आहे. त्यामुळे पावसाळ््यात थेट घरात व सोसायटीमध्ये पाणी घुसते. संभाजीनगर भागात धोकादायकरीत्या विद्युत तारा आहेत. त्याविषयी विद्युत वितरण विभागाला अनेकदा कळविले आहे. परंतु, कारवाई झालेली नाही.
- गजानन हाडके, मनसे.
एकही सार्वजनिक सुविधा नाही...
४‘‘रस्ते, पाणी व सांडपाण्याची मूलभूत सुविधा देणे महापालिका नगरसेवक व प्रशासनाचे अत्यावश्यक कर्तव्य आहे. परंतु, प्रभाग क्रमांक ६९ मध्ये एकही सार्वजनिक सुविधा नाही. त्याचबरोबर विकास आराखड्यातील सार्वजनिकहिताची आरक्षणाच्या जागा ताब्यात घेऊन, त्याठिकाणी उद्यान, मैदान, हॉस्पिटल, शाळा विकसित करण्याची आवश्यकता आहे,’’ असे राष्ट्रशक्ती संघटनेचे अध्यक्ष माऊली दारवटकर यांनी सांगितले.
घरे खाली
अन् रस्ते वर...
४तळजाई व आंबेगाव पठार, धनकवडी गावठाणाचा भौगोलिक परिसर चढ-उताराचा आहे. त्यामुुळे ड्रेनेजलाईनचा बोजवारा उडाला आहे. घरांचे ओटे खाली आणि रस्ते वर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाळ््यात थेट पाणी घरात घुसत आहे. कचऱ्याची गाडी वेळेवर येत नसल्याने मोकळ््या जागेत कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रत्येक सुविधा देताना दूरगामी विचार करून कामे करण्याची आवश्यकता आहे, असे आदर्श मित्र मंडळाचे संस्थापक उदय जगताप यांनी सांगितले.

Web Title: Narrow roads, transporters, drainage durations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.