शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

Sharad Pawar: मोदींना सरकार बनवण्यासाठी चंद्रबाबू, नितीशकुमारांची मदत घ्यावी लागली - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 11:02 IST

देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ठोस पावले टाकणारे हे सरकार असेल, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली

बारामती : मोदीसाहेबांनी (Narendra Modi) सरकार बनवले. पण त्यासाठी त्यांना चंद्रबाबू (Chandrababu Naidu), नितीशकुमार(Nitish Kumar) यांची मदत घ्यावी लागली. हे विसरुन चालणार नाही. अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ठोस पावले टाकणारे हे सरकार असेल, अशी अपेक्षा पवार शरद (Sharad Pawar) पवारांनी व्यक्त केली. बारामतीत आयोजित व्यापारी मेळाव्यात ते बोलत होते. सामान्य माणसांच्या सामूहिक शहाणपणामुळे देशाची लोकशाही टीकली. गेली १० वर्ष राज्यकर्ते प्रत्येक गोष्टीत टाेकाची भुमिका घेत होेते. त्या राज्यकर्ते यांना जमीनीवर पाय टेकवले पाहिजेत, हा संदेश सर्वसामान्य जनतेने लोकसभा निवडणुकीतून दिला, असा टोलाही त्यांनी भाजप नेत्यांना  लगावला. 

यावेळी पवार पुढे म्हणाले,  एकंदरीत देशाच्या निकालाचे चित्र पाहिल्यास पाच वर्षांपुर्वी  आणि आज सत्तेत असणाऱ्यांना ३०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या. यंदा त्यात ६० जागांची घट झाली आहे. यात उत्तर प्रदेश हे महत्वाचे राज्य आहे. राम मंदीर हा प्रचाराचा मुद्दा असेल, राममंदीराचे मतदान सत्ताधाऱ्यांकडे जाइल, असे निवडणुकीपुर्वी  वाटले होते. मात्र, मंदीराच्या नावाने मते मागितल्यावर लोकांनी वेगळा निकाल दिला. अयोध्येमध्ये भाजपचा पराभव झाला. ज्या ठीकाणी मंदीर झाले, तेथील सामान्य लाेकांनी मंदीराचे राजकारण दुरुस्त केल्याचा टोला पवार यांनी लगावला.  बारामतीच्या निवडणुकीबाबत त्यावेळी माध्यमांमधून अनेक गोष्टी पुढे येत होत्या, पण बारामतीकर शहाणे आहेत.हे मला माहिती असल्याने  मी शांत होतो.बारामतीकरांचा शहाणपणा या निवडणुकीच्या निमित्ताने पहावयास मिळाल.१२५० बुथपैकी ११९० बुथवर आम्हाला बहुमत  मिळाले.१९६७ पासून हा शहाणपणा अनुभवयास मिळत आहे.बारामतीकर शहाणपणापासून बाजूला गेले नाहीत.या बारामतीची चर्चा यंदा न्युयाॅर्कपर्यंत पोहचली.बारामतीकर साधे नाहीत,अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लोकसभेत बारामतीकरांनी दिलेल्या मताधिक्यक्यावर कृतज्ञता व्यक्त केली. निवडणूक झाली. लोकांनी काय निकाल द्यायचा तो दिला. आता जबाबदारी कामाची आहे. बारामतीसह जिल्ह्यातील अन्य एमआयडीसींमध्ये मोठे उद्योग लवकरच आणले जातील, त्यासाठी केंद्र व राज्याची मदत घेतली जाईल, अशी ग्वाही ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूNitish Kumarनितीश कुमार