शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाला ८ वर्षांनी गती मिळणार; आरोपींवर दोषारोपपत्र निश्चित, लवकरच खटला सुरु होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 17:22 IST

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयापुढे बुधवारी ही सुनावणी झाली.

ठळक मुद्दे आरोपी सचिन अंदुरे, विरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी हजर

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या आठ वर्षानंतर डॉ विरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अँड संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर दोषारोप निश्चित करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा कबूल आहे का? असे विचारले असता आरोपींनी गुन्हा नाकारला, त्यावर आता ३० सप्टेंबरला सरकार व बचाव पक्षातर्फे पुराव्यासंबंधीची कागदपत्रे सादर केली जाणार आहेत. त्यामुळे खटला सुरू होण्यास गती मिळणार आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयापुढे बुधवारी ही सुनावणी झाली. कोरोनाचं कारण सांगून आरोपींनी वकील व नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी आरोप निश्चितीस पुन्हा मुदत देण्याची विनंती न्यायालयाला केली. मात्र ७ सप्टेंबरच्या सुनावणीवेळीच न्यायालयाने पुन्हा मुदतवाढ मिळणार नसल्याचे सांगितले होते. त्याचा पुनरूच्चार न्यायाधीशांनी केला.

या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे, विरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी हजर होते, तर आरोपी संजीव पुनाळेकर व विक्रम भावे प्रत्यक्ष उपस्थित होते. बुधवारी सुनावणीच्या वेळी आरोपींचे वकील अँड वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी सांगितले की, शरद कळसकर याच्याशी सात दिवसात बोलणं झालेलं नाही. पुढच्या तारखेला त्याला न्यायालयात हजर केले जाईल. त्यावर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमधील अडचणींमुळेऔरंगाबाद कारागृहात असलेला सचिन अंदुरे आणि आर्थर रोड कारागृहात असलेला शरद कळसकर या दोघांना पुण्यातील येरवडा कारागृहात हलविण्याचे आदेश न्यायालयाने दिले.  आरोपींनी गुन्हा कबूल केला तरी लगेच सुनावणी सुरू होणार नाही. वकिलांशी विचारनियम करायला वेळ दिला जाईल..कोर्टाकडे इतरही खूप खटले आहेत. त्यामुळे दोषारोप निश्चित करण्यासाठी पुन्हा वेळ देता येणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले. आरोपी विरेंद्रसिंह तावडे यानं न्यायालयास सांगितले की, माझा २४ तासापूर्वी वकील आणि नातेवाईकांशी संपर्क झाला आहे. वकील आणि मेव्हण्याशी बोलल्यानंतर त्यांच्या मनात शंका निर्माण झाल्या आहेत. पाच वर्षे मी जेलमध्ये खितपत पडलो आहे. आता अचानक केस चालविण्याच्या स्थितीमुळे मला धक्का बसला आहे. या केसबाबात विचार करायला वेळ मिळावा. आम्हाला प्रतिवाद करण्यासाठी वेळ दिला नाही तर अन्याय होईल. त्यावर दोषारोपपत्रावर वकिलांशी बोलूनच ऑर्डर निघाली आहे. नातेवाईकांशी बोलायला पुरेशी मदत दिली जाईल. केवळ आरोपींना गुन्हा कबूल आहे का ते सांगावे. मात्र पाचही आरोपींनी गुन्हा कबूल नसल्याचे न्यायालयास सांगितले.    डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ ला हत्या झाली. या गुन्हयात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या दोषारोपपत्रात डॉ. विरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर यांच्याविरोधात कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप ठेवण्यात आले आहेत. तर अ‍ॅड. पुनाळेकर आणि भावे यांच्याविरोधात पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहेत. तावडे, अंदुरे आणि कळसकर हे कारागृहात असून, अँड. पुनाळेकर आणि भावे जामिनावर आहेत.

टॅग्स :PuneपुणेNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय