शहरं
Join us  
Trending Stories
1
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
2
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
3
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
4
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
5
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
6
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
7
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
8
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
9
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
10
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
11
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
12
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
13
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
14
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
15
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
16
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
17
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
18
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
19
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
20
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त

Maharashtra Cabinet: मंत्रिपदासाठी २ आमदारांची नावं चर्चेत; पुण्यातील 'या' नावांचीही चर्चा सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 12:16 IST

अजित पवार, दिलीप वळसे पाटलांबरोबर शिरुर, भोर, आंबेगाव, इंदापूरातील शिलेदार मंत्रिपदाच्या शर्यतीत

पुणे: जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला बारामती, शिरुर, भोर, आंबेगाव, इंदापूर तालुक्यात आपला गड राखण्यात यश आले आहे. भाजपने दौंड तालुक्यातील आपली जागा कायम राखली आहे. पुरंदरमध्ये शिवसेना शिंदे गटाने आपली जागा काबीज गेली आहे. खेडमध्ये शिवसेना उबाठा गटाने यश मिळवले आहे, तर जुन्नर मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी गटाच्या उमेदवारांना धूळ चारत अपक्ष शरद सोनवणे यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. सध्या मंत्रिपदासाठी जिल्ह्यात बारामती अजित पवार, आंबेगाव दिलीप वळसे-पाटील, दौंड राहुल कुल, पुरंदर विजय शिवतारे तसेच जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे, जर जातीय समीकरणाद्वारे पाहिलं तर दत्तात्रय भरणे यांचाही मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. त्यामुळे जिलह्यातील पाच शिलेदार मंत्रिपदाच्या रेसमध्ये असल्याचे दिसून येत आहे. परंतु, आज होणाऱ्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार? याबाबत जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तसेच आजच्या मंत्रिमंडळाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

बारामतीत काका विरूद्ध पुतण्या झालेल्या लढाईत अजित पवार यांनी आपला वरचष्मा कायम ठेवला आहे. दौंड तालुक्यात झालेल्या थोरात - कुल यांच्या लढाईत राहुल कुल यांनी आपल्या विकासकामांच्या जोरावर आमदारकी कायम राखली आहे. पुरंदरमध्ये विजय शिवतारे यांनी काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांचा दारुण पराभव केला आहे. शिवतारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात केलेल्या चमकदार कामगिरीमुळे त्यांच्या नावांची चर्चा होऊ शकते, असा मतप्रवाह राजकीय वर्तुळात सुरू आहे. आंबेगाव तालुक्यात दिलीप वळसे-पाटील यांनी देवदत्त निकम यांचा पराभव केला आहे. तसेच अनेक वर्षे मंत्रिमंडळातील अनुभवी नेतृत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. त्यामुळे मंत्रिपदाच्या शर्यतीतील चेहरा कायम आहे. जुन्नरचे नवनिर्वाचित आमदार शरद सोनवणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मित्र आहेत. शरद सोनवणे पुणे जिल्ह्याचे शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. शरद सोनवणे आमदार होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने तातडीने भेटीसाठी जुन्नर तालुक्यात हेलिकॉप्टर सोनवणे यांना घेण्यासाठी आले होते. यावेळी जुन्नरला शरद सोनवणे यांच्या रुपाने मंत्रिपद मिळणारच, असा जनतेतून सूर आहे आणि एकनाथ शिंदे तो पूर्ण करतील, असेही बोलले जात आहे. मंत्रिमंडळात जातीय आरक्षणानुसार पाहिलं तर धनगर समाजाचे नेतृत्व म्हणून इंदापूर तालुक्यातून आमदार दत्तात्रय भरणे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती