शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील 43 हजार 675 मतदारांची नावे वगळली जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 14:20 IST

कोथरूड मतदार संघाची एकुण मतदार संख्या चार लाख 18 हजार 644 असून यापैकी सुमारे 43 हजार 675 नागरिकांचे मतदार यादीत फोटो नसल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले आहे.

पाषाण : मतदार यादी मध्ये फोटो नसल्याच्या कारणावरून कोथरुड मतदारसंघातील सुमारे 43 हजार 675 मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. कोथरुड विधानसभा मतदार संघाच्या (210) निवडणूक कार्यालयाच्या वतीने सदर नागरिकांचे फोटो जोडण्याबाबत नोटीस पाठवण्यात आले आहेत.

कोथरूड मतदार संघाची एकुण मतदार संख्या चार लाख 18 हजार 644 असून यापैकी सुमारे 43 हजार 675 नागरिकांचे मतदार यादीत फोटो नसल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले आहे. फोटो सादर न केल्यास नाव मतदार यादीतून वगळनेबाबत निवडणूक आयोग विचार करत असून फोटो नसलेल्या नागरिकांना फोटो सादर करण्याचे आवाहन देखील नोटीसद्वारे करण्यात आले आहे.

एकुण मतदार संख्या दहा टक्के एवढ्या मतदारांचे अध्याप फोटो उपलब्ध नसल्याची माहिती कोथरूड मतदार संघाचे अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी संदीप खलाटे यांनी दिली. तसेच मतदार यादी अधिकृत मतदार संकेतस्थळावर उपलब्ध असून नागरिकांनी पाहणी करून मतदार फोटो सादर करण्याचे आवाहन केले जात आहे.

टॅग्स :PuneपुणेkothrudकोथरूडVotingमतदानAundhऔंध