शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मनसे मोर्चाच्या बसवर भाजपा आमदाराचं नाव; मोर्चानिमित्त मनसे-भाजपा कार्यकर्ते एकत्र? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 09:21 IST

पुण्यातून मोर्चासाठी निघणाऱ्या बसवर भोसरीचे भाजपा आमदार महेश लांडगे यांचे नाव असल्याने या मोर्चासाठी भाजपाचंही पाठबळ मनसेला मिळालं आहे का?

पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाकिस्तान, बांग्लादेशी घुसखोरांविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे मनसेचा मोर्चा चर्चेत आला आहे. राज ठाकरेंनी सीएए कायद्याला थेट पाठिंबा दिला नसला तरी कुठेतरी मनसेची भूमिका भाजपाच्या सोयीचं आहे. मनसेकडून गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान महामोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चासाठी राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहे.

पुण्यातून मोर्चासाठी निघणाऱ्या बसवर भोसरीचे भाजपा आमदार महेश लांडगे यांचे नाव असल्याने या मोर्चासाठी भाजपाचंही पाठबळ मनसेला मिळालं आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. डेक्कन भागातून मनसेचे कार्यकर्ते मुंबईत मोर्चासाठी येणार आहे. मात्र या कार्यकर्त्यांसाठी ठेवण्यात आलेल्या गाडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. महेश लांडगे यांच्या पाहुण्यांची ही गाडी आहे असं सांगण्यात येत आहे. तर मनसेच्या या मोर्चासाठी पुण्यातील हिंदुत्ववादी संघटनाही सहभागी होणार असल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. 

हिंदू जिमखाना ते आझाद मैदान... 'मनसे'चा महामोर्चा, पोलिसांची करडी नजर

दरम्यान, मनसेच्या या मोर्चामागे भाजपाचा हात आहे असा आरोप शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी केला आहे. भाजपाला कधीच महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणता येत नाही, त्यांना दुसऱ्या पक्षाच्या कुबड्या कायम लागतात. पहिलं वंचितला सोबत घेण्याचा प्रयत्न केला आता मनसेला घेतायेत. भाजपाचे आशिष शेलार वारंवार कृष्णकुंजला भेटीगाठी करतात, त्यानंतर हा मोर्चा निघतो, या मोर्चामागे भाजपाचा हात असल्याची शक्यता आहे असं मनिषा कायंदे यांनी म्हटलं आहे. 

मनसेचा महामोर्चा भाजपा पुरस्कृत; शिवसेनेची राज ठाकरेंवर जहरी टीका 

मनसेच्या मोर्चाचा मार्ग?दुपारी 12 वाजता गिरगाव चौपाटी- हिंदू जिमखाना येथून मोर्चाला सुरुवात होईल. स्वतः राज ठाकरे मोर्चात सामील असतील. सर्व कार्यकर्ते, मोर्चात सहभागी होणाऱ्या संघटना आणि सर्वसामान्य नागरिक मागे असतील. शामलदास गांधी मार्गावरुन हा मोर्चा पुढे जाईल. तिथून मेट्रो सिनेमा भागात मोर्चा पोहोचल्यानंतर राज ठाकरे आणि काही नेते महापालिका मार्गावरुन आझाद मैदानात आत जातील. मनसे कार्यकर्ते आणि मोर्चात सहभागी झालेल्या व्यक्ती फॅशन स्ट्रीटच्या समोरील रस्त्यावरुन तीन गेटनी आझाद मैदानात आत जातील.

मनसे मोर्चा लाईव्ह अपडेटसाठी वाचा - MNS Morcha Live: मनसेचा महामोर्चा : मोर्चाच्या बसेसवर भाजपा आमदारांचं नाव, चर्चेला उधाण!

टॅग्स :MNSमनसेHindutvaहिंदुत्वBJPभाजपाPakistanपाकिस्तान