MNS Morcha Live: जास्त नाटकं कराल तर खबरदार... राज ठाकरेंचा रोखठोक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2020 08:27 AM2020-02-09T08:27:44+5:302020-02-09T16:51:54+5:30

राज्यभरातून 1 ते 2 लाख लोक या मोर्चासाठी येण्याची शक्यता आहे.

Raj Thackeray MNS March in Mumbai against Illegal immigrants; Live Updates of Mahamorcha | MNS Morcha Live: जास्त नाटकं कराल तर खबरदार... राज ठाकरेंचा रोखठोक इशारा

MNS Morcha Live: जास्त नाटकं कराल तर खबरदार... राज ठाकरेंचा रोखठोक इशारा

googlenewsNext

मुंबई : पाकिस्तानी व बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) मोर्चा निघणार आहे. गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखाना ते आझाद मैदान या मार्गावर हा मोर्चा असणार आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मोर्चाला सुरुवात होईल. त्यानंतर ते आझाद मैदानावरील सभेला संबोधित करतील. राज्यभरातून 1 ते 2 लाख लोक या मोर्चासाठी येण्याची शक्यता आहे. यासाठी आझाद मैदानावर तयारी सुरू झाली आहे. तसेच, मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करणारे बॅनर मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.

या मोर्चात सहभागी होण्यासाठी नाशिक शहरातून मनसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. नाशिकहून मुंबईला निघण्यापूर्वी मखमलाबाद नाका परिसरातील हनुमान मंदिरात मनसैनिकांनी दर्शन घेतले. तसेच, वाहनांना मनसेचे भगवे झेंडे आणि होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. 

राज ठाकरेंचे भाषण 

- जास्त नाटकं कराल तर दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर देऊ

 

- अनेक मराठी मुसलमान तिथे दंगली होत नाही

- प्रत्येकवेळी माणुसकीचा ठेका भारतानेच घेतला आहे का? 

- सीएएमध्ये गैर काय आहे, हा देश म्हणजे धर्मशाळा वाटते काय? 

- सरकारच्या चांगल्या निर्णयांचे अभिनंदन केले की भाजपाचा समर्थक, टीका केली की भाजपविरोधी

- सीएए, एनआरसीविरोधात मोर्चे काढण्याची गरजच काय होती, जे आधीपासून या देशात राहताहेत त्यांना काढण्याची तरतूदच कायद्यात नव्हती, मग हे मोर्चे काढून ताकद कुणाला दाखवत होता 

सीएए, एनआरसीवर कायद्याची माहिती नसणारेही टीका करतात 

- मोर्चाला मोर्चाने यशस्वीपणे उत्तर दिले

- राज ठाकरे यांनी मानले मनसैनिकांचे आभार 

मनसेच्या मोर्चात सर्वधर्मीयांचा सहभाग 

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधातील मनसेच्या मोर्चाला मनसैनिकांची मोठी गर्दी


राज ठाकरे सिद्धिविनायकाच्या चरणी
निवासस्थानातून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी मोर्चाच्या ठिकाणी जाण्याआधी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी पत्नी शर्मिला ठाकरे याही त्यांच्यासोबत होत्या. बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आता राज ठाकरे मोर्चासाठी रवाना झाले आहेत. 

'हिंदुहृदयसम्राटास महाराष्ट्र सैनिकांकडून अभिवादन!'
मोर्चात सहभागी होण्यापूर्वी मनसैनिकांनी दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर मनसैनिक मोर्चाकडे रवाना झाले. यासंदर्भातील ट्विट मनसेने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. 

मोर्चापूर्वी 'कृष्णकुंज'वर तयारी, अनिल शिदोरेंना 'आर्म बँड' बांधताना...
थोड्याच वेळात राज ठाकरे 'कृष्णकुंज'वरुन मोर्चाकडे रवाना होणार आहेत. या मोर्चापूर्वी राज ठाकरे यांनी मनसे नेते अनिल शिदोरेंना 'आर्म बँड' बांधताना दिसून आले. 

हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल
पाकिस्तान, बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांना देशातून बाहेर काढण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. थोड्याच वेळात या मोर्चाला सुरूवात होत असून, नाशिक, औरंगाबाद, पुण्यासह राज्यभरातून हजारो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक
चेंबूरमध्ये मनसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्यादुग्धाभिषेक करून या मोर्चाला निघण्यास सुरुवात केली आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दूध, दही, तुपाने अभिषेक करीत कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांचा जयजयकार केला. चेंबूरमधून मनसेचे शेकडो कार्यकर्ते या मोर्चात सहभाग घेणार आहेत.

मोर्चामुळे शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली 
मनसेचा घुसखोरांविरूद्धचा मोर्चा भाजपा पुरस्कृत असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. यावर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "तेरा वर्ष आमचा पक्ष भाजपानं पोसलेला नाही. आमच्या मोर्चामुळे शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच अशा पद्धतीनं टीका केली जात आहे. पण, त्याला गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. आम्ही मोर्चातून उत्तर देऊ."

'हे' मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
गिरगाव चौपाटीजवळील हिंदू जिमखाना ते आझाद मैदान या मार्गावर हा मोर्चा असणार आहे. मात्र, या मोर्चासाठी मुंबईतील काही मार्ग बंद केले आहेत. तर काही मार्गात बदल करण्यात आले आहेत. याचबरोबर, मोर्चात अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. 

ज्यांचे सरकार अजित पवार चालवतात, त्यांनी आम्हाला शिकवू नये -  अविनाश जाधव 
मनसेचा मोर्चा भाजपा पुरस्कृत आहे असा आरोप शिवसेनेने मनसेवर केला होता. यावरुन मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. अविनाश जाधव म्हणाले, "ज्यांचे सरकार अजित पवार चालवतात त्यांनी आम्हाला शिकवू नये, मुख्यमंत्र्यांकडे जेवढी गर्दी होत नाही तेवढी अजितदादांकडे असते. थोड्या दिवसाने अजित पवार शिवसेना चालवतील, सत्तेसाठी शिवसेनेने जी चूक केली आहे, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार आहेत."

काळे आणि भगवे टी शर्ट
आझाद मैदानावर आलेल्या मनसैनिकांनी पाकिस्तान आणि बांगलादेशी यांना परतवून लावण्याच्या मागणीचे टीशर्ट परिधान केले आहेत. त्याचप्रमाणे मनसेच्या नव्या झेंड्यांच्या रंगाचे आणि झेंड्यावर असलेल्या राजमुद्राचे चिन्ह असलेले टीशर्ट अनेका मनसैनिकांनी परिधान केल्याचे दिसून येत आहे. 

दादरमध्ये मनसे नेत्यांकडून आरती
मोर्चाआधी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी दादरच्या राममंदिरात आरती केली. यावेळी मनसचे संदीप देशपांडे, संतोष धुरी, अमेय खोपकर उपस्थित होते.

मोर्चात एक ते दीड लाख लोक सामील होणार, मनसे नेत्याचा दावा
महाराष्ट्राच्या विविध भागातून मनसे कार्यकर्ते येण्यास सुरुवात झाली आहे. सुमारे एक ते दीड लाख लोक यामध्ये सामील होतील, असा दावा मनसे नेते अरविंद गावडे यांनी केला.

मनसेच्या वाहनांना टोल फ्री...
मोर्चात सहभागी होणाऱ्या मनसेच्या वाहनांकडून टोल आकारण्यात आला नाही. वाहनांना टोल आकारला जाऊ नये, यासाठी मनसेकडून निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार, पुणे आणि नाशिकहून मुंबईला येणाऱ्या वाहनांना टोल मोफत करण्यात आला. 

'आज मनसेचा बुलंद आवाज मुंबईत घुमणार, या आणि सामील व्हा'
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी नागरिकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. 

शिवसेना हीच राष्ट्रवादी काँग्रेसची 'बी टीम' झालीय; शिवसेनेच्या टीकेवर मनसेचा टोला 
मनसेचा मोर्चा हा भाजपा पुरस्कृत आहे, त्यामुळे मनसेच्या मोर्चाचा कुठेही शिवसेनेवर परिणाम होणार नाही अशी टीका शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी केली होती. त्यावर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर देत शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेसची बी टीम झाली आहे, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे म्हणून शिवसेनेकडून टीका करण्यात येत आहे असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे. 

BJP give buses for mns morcha, मनसेच्या मोर्चासाठी भाजप आमदाराच्या गाड्या

मोर्चासाठी भाजपा आमदाराच्या गाड्या, चर्चेला उधाण
मनसेचे पुण्यातील कार्यकर्तेही मोर्चासाठी मुंबईला येण्यास निघाले आहेत. विशेष म्हणजे, मोर्चासाठी पुण्यातील मनसैनिकांना घेऊन येण्यासाठी बस वापरण्यात आल्या आहे. त्या बसेस भाजपाचे भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या असल्याचे सांगण्यात येत आहे. या बसेसवर आमदार महेश लांडगे यांचे नावही दिसत आहेत. त्यामुळे मनसेच्या या मोर्चाला भाजपाचा पाठिंबा असल्याची चर्चा सुरु आहे. तसेच, या मनसैनिकांसोबत भाजपाचेही काही कार्यकर्ते असल्याचेही समजते. 

Hindu Gymkhana to Azad Maidan... Security tightens for MNS

असा असणार मनसेच्या मोर्चाचा मार्ग?
गिरगाव चौपाटी- हिंदू जिमखाना येथून दुपारी 12 वाजता मोर्चाला सुरुवात होईल. स्वतः राज ठाकरे मोर्चात सामील असतील. सर्व कार्यकर्ते, मोर्चात सहभागी होणाऱ्या संघटना आणि सर्वसामान्य नागरिक मागे असतील. शामलदास गांधी मार्गावरुन हा मोर्चा पुढे जाईल. तिथून मेट्रो सिनेमा भागात मोर्चा पोहोचल्यानंतर राज ठाकरे आणि काही नेते महापालिका मार्गावरुन आझाद मैदानात आत जातील. मनसे कार्यकर्ते आणि मोर्चात सहभागी झालेल्या व्यक्ती फॅशन स्ट्रीटच्या समोरील रस्त्यावरुन तीन गेटनी आझाद मैदानात आत जातील.

मनसेचा महामोर्चा भाजपा पुरस्कृत; शिवसेनेची राज ठाकरेंवर जहरी टीका 
हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या मनसेच्या या भूमिकेवर शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी सडकून टीका केली आहे. मनसेचा मोर्चा हा भाजपा पुरस्कृत आहे,  असे सांगत या मोर्चामुळे कुठेही शिवसेनेला फटका बसणार नाही असा दावा त्यांनी केला आहे. मनिषा कायंदे म्हणाल्या की, मनसेच्या मोर्चाचा शिवसेनेला फटका बसणार नाही, बाळासाहेब ठाकरे यांचेच मुद्दे मनसे पुढे घेऊन जात आहे, पाकिस्तानी, बांग्लादेशी हे मुद्दे आत्ताच का आठवले? गेली १४ वर्ष मनसे कुठे होती? मनसेची भूमिका सतत बदलणारी आहे. या मोर्चामागे भाजपाचाच हात आहे, असा आरोप त्यांनी केला. 

हर्षवर्धन जाधव, प्रकाश महाजन मनसेत परतले
कन्नडचे (जि. औरंगाबाद) माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शनिवारी मनसेत पुन्हा प्रवेश केला. भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत प्रमोद महाजन यांचे भाऊ प्रकाश महाजन हेही मनसेत परतले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत कृष्णकुंजवर प्रवेशाचा कार्यक्रम झाला. जाधव, महाजन यांच्याशिवाय औरंगाबादमधील सेना नेते सुहास दशरथे, नांदडेचे प्रकाश कौदगे यांनीही मनसेत प्रवेश केला. जाधव हे दिवंगत नेते रायभान जाधव यांचे पुत्र असून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.

 

Web Title: Raj Thackeray MNS March in Mumbai against Illegal immigrants; Live Updates of Mahamorcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.