शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 18:16 IST2025-10-19T18:14:31+5:302025-10-19T18:16:18+5:30
नमाज पठणाचा कथित व्हिडीओ समोर आल्यानंतर पतित पावन संघटनेकडून शनिवार वाड्याच्या परिसरात गोमुत्र शिंपडण्यात आलं.

शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
Pune Shaniwar Wada: पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याचा दावा केला जात आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली असून, विविध हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पतित पावन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवार वाड्यात आंदोलन केलं. संघटनेने सांगितलं की, त्यांनी त्या जागेवर गोमूत्र शिंपडून ती जागा पवित्र केली तसेच शेणाने सारवून जागा शुद्ध करण्याचा विधीही पार पाडला. यानंतर शनिवारवाड्यात ‘शिववंदना’ सादर करण्यात आली. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, अशा प्रकारच्या घटना भविष्यात सहन केल्या जाणार नाहीत.
शनिवार वाड्यात नमाज पठण चालणार नाही, हिंदू समाज आता जागृत झाला आहे ! 🚩🚩
— Dr. Medha Kulkarni (@Medha_kulkarni) October 19, 2025
🚩चलो शनिवार वाडा! 🚩
रविवार, 19 ऑक्टोबर 2025
📍 शनिवार वाडा, कसबा पोलीस चौकीसमोर
🕓 सायंकाळी 4 वाजता
---
🔥 पुण्याचे वैभव – शनिवार वाडा
ऐतिहासिक वारसा स्थळ की गैर हिंदू प्रार्थना स्थळ?
सारसबाग येथे… pic.twitter.com/EObcXMZ6Rt
खासदार मेधा कुलकर्णींची प्रतिक्रिया
मेधा कुलकर्णी यांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटलं की, “यापुढे अशा प्रकारचे प्रकार काहीही झालं तरी आम्ही खपवून घेणार नाही.” त्यांनी प्रशासनाला अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.