नगररचनाकार सहसंचालक नाझीरकरांसह तिघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 03:44 AM2017-07-19T03:44:29+5:302017-07-19T03:44:29+5:30

अमरावती येथील नगररचनाकार सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यासह त्यांच्या पत्नीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा अखेर दाखल करण्यात आला आहे़ प्रथमवर्ग

Nagarpalankar Joint Director Najirkar, crime against three | नगररचनाकार सहसंचालक नाझीरकरांसह तिघांविरुद्ध गुन्हा

नगररचनाकार सहसंचालक नाझीरकरांसह तिघांविरुद्ध गुन्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अमरावती येथील नगररचनाकार सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यासह त्यांच्या पत्नीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा अखेर दाखल करण्यात आला आहे़ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एऩ डी़ मेश्राम यांनी गेल्या महिन्यात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्यानंतर दत्तवाडी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे़
नगररचनाकार सहसंचालक हनुमंत जगन्नाथ नाझीरकर (वय ५३), त्यांची पत्नी संगीता हनुमंत नाझीरकर (वय ४२, दोघेही रा. स्वप्नशिल्प सोसायटी, कोथरूड) आणि नवनाथ आॅटोमोबाईल कंपनीचे भागीदार प्रवीण सोरटे (३०, रा. सिंहगड रोड, पर्वती) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत़ याप्रकरणी नितीन साहेबराव पाटील (रा़ कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे़
पाटील यांची ओम साई आॅटोमोबाईल्स नावाची एजन्सी आहे़ यापूर्वी ते एका कंपनीत काम करीत होते़ त्यांना व्यवसाय सुरू करायचा असल्याने ते भागीदाराचा शोध घेत होते़ नाझीरकरांनी त्यांना आॅटोमोबाईल शोरूममध्ये भागीदारी करण्याची विनंती केली़ पत्नी संगीता नाझीरकर यांच्या नावावर आपण भागीदारी व्यवसाय करू, असे त्यांनी सांगितले़ त्यानंतर त्यांनी २०१२ मध्ये ओम साई आॅटोमोबाईल्स नावाची फर्म स्थापन केली़ सुरुवातीला व्यवसायातील प्रत्येक निर्णय ते दोघे मिळून घेत होते़ २०१५ पर्यंत ६ नवीन शोरूम सुरू केल्या़ मात्र, नाझीरकर यांच्याकडून आर्थिक बाबींमध्ये पारदर्शकता ठेवली जात नसल्याने त्यांच्यामध्ये सप्टेंबर २०१५ पासून वाद होऊ लागले़ मार्च २०१६ मध्ये त्यांच्यातील भागीदारी संपुष्टात आली़ एकूण ७ युनिटपैकी ४ युनिट संगीता नाझीरकर यांच्याकडे व ३ युनिट नितीन पाटील यांच्याकडे आल्या़
संगीता नाझीरकर यांनी त्यांचे पुतणे प्रवीण सोरटे यांच्याबरोबर भागीदारीत नवनाथ आॅटोमोबाईल नावाची नवीन फर्म स्थापन केली़ डिसेंबर २०१६ मध्ये ओमसाई आॅटोमोबाईल या पाटील यांच्या नावावरील फर्मच्या प्रमाणपत्राचे संगीता नाझीरकर यांनी नूतनीकरण करून एकूण १८० दुचाकी गाड्यांचे खोटे सेल लेटर बनवून आरटीओ यांच्याकडे जमा करून एप्रिल ते सप्टेंबर २०१६ या कालावधीत त्या दुचाकी वाहनांची नोंदणी केली़ त्या दुचाकींची विक्री नवनाथ आॅटोमोबाईल या फर्मकडून झाली़ त्यामुळे या दुचाकी वाहनांचा विक्रीकर पाटील यांना भरावा लागला़ पाटील यांच्या गुडविलचा त्यांच्या परवानगी शिवाय वापर करून विश्वासघात केला व त्यांच्या फर्मच्या नावाचे बनावट सेल लेटर बनवून १८० गाड्यांची विक्री करून पाटील यांची आर्थिक फसवणूक केली़, असे या फिर्यादीत म्हटले आहे़

Web Title: Nagarpalankar Joint Director Najirkar, crime against three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.